LIVE मॅचमध्ये हात उचलणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरला पडला मार, अखेर मैदानावर काहीही करा, असा ‘मार’ देतंच ICC

मॅच रोमाचंक सुरु असताना कोण जिंकेल अशी उत्सुकता ताणली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या विकेट पडायला लागल्याने, मैदानात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी उत्साह सुरु केला होता.

LIVE मॅचमध्ये हात उचलणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरला पडला मार, अखेर मैदानावर काहीही करा, असा 'मार' देतंच ICC
आशिया चषकातील कालचा सामना एकदम रोमांचक होता. त्यामुळे विजयानंतर प्रेक्षकांनी सुद्धा अधिक इन्जॉय केला Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 11:53 AM

आशिया चषक (Asia Cup 2022) सुरु झाल्यापासून खेळाडूंमधील (Player) अनेक घडामोडी बाहेर आल्या आहेत. आशिया चषकात खेळाडूंचा झालेला संघर्ष वारंवार समोर आला आहे. त्यामुळे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भारत पाकिस्तान सामना सुरु असताना सुद्धा दोन्ही खेळाडूंमध्ये अनेकदा संघर्ष झाला आहे. आशिया चषकातील सुपर चार मधील पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना सुरु असताना आसिफ अली आणि फरीद अहमद यांच्यात जोरदार वादावादी झाली. यानंतर आसिफ अली (Asif Ali) यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी अफगाण क्रिकेट बोर्डाने केली होती.

मॅच रोमाचंक सुरु असताना कोण जिंकेल अशी उत्सुकता ताणली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या विकेट पडायला लागल्याने, मैदानात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी उत्साह सुरु केला होता. त्याचवेळेस फरीद अहमद याने आसिफ अलीची विकेट घेतली. फरीद अहमद याने असिफ अलीला पाहून जोरदार आनंद साजरा केला. त्यावेळी असिफ अलीने फरीद अहमदच्या अंगावर बॅट घेऊन धावला.

ज्यावेळी हे प्रकरण मैदानात घडतं होतं, त्यावेळी इतर खेळाडूंनी तात्काळ मध्यस्थी केल्याने हे प्रकरण मिटलं. परंतु त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्यामुळे असीफ अलीवर जोरदार टीका झाली. त्यानंतर आयसीसीने या दोघांना मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला आहे.

झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या चाहत्यांना अफगाण चाहत्यांनी मारहाण सुद्धा केली आहे. त्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.