आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलली, कारण अस्पष्ट
मात्र चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे मानले जात आहे.
नवी दिल्ली – आशियाई क्रीडा स्पर्धेचा (Asian Games) 19 वा सीजन पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. चीनी (china) मीडियांच्या बातम्यानुसार, कोरोना (corona) महामारीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या नव्या तारखा जाहीर केल्या जातील. आशियाई क्रीडा स्पर्धेची 19वा सीजन चीनमधील ग्वांगझू येथे 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार होता. आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यामागे ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाने कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे मानले जात आहे. आशियाई खेळ चीनमधील ग्वांगझू येथे होणार होते. ते देशातील सर्वात मोठे शहर शांघायच्या अगदी जवळ आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे शांघाय अनेक आठवड्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहे.
56 खेळांसाठी मैदान तयार
आयोजकांनी गेल्या महिन्यात माहिती दिली होती की चीनच्या पूर्वेकडील शहर ग्वांगझूची लोकसंख्या 12 दशलक्ष आहे. तेथे 56 खेळांसाठी मैदान तयार करण्यात आले आहे. या मैदानांवर आशियाई खेळ आणि आशियाई पॅरा गेम्स होणार आहेत. चीनने यापूर्वी हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन केले होते. त्यामध्ये कोरोनाची प्रकरणे रोखण्यासाठी कोविडपासून सुरक्षित राहण्यासाठी सगळी यंत्रणा तयार होती. यावेळी देखील आशियाई खेळ कोरोनापासून सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले होते.
भारताच्या सहभागावर शंका होती
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सहभागाबाबत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, चीनकडून प्रतिक्रिया मिळाल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच एका कार्यक्रमादरम्यान बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले होते. चीनमध्ये परिस्थिती काय आहे आणि यजमान देश सध्याच्या परिस्थितीबद्दल काय म्हणतो हे महत्त्वाचे आहे. सर्व सहभागी देश यावर चर्चा करत आहेत आणि लवकरच भारत देखील निर्णय घेईल, परंतु त्यापूर्वी यजमान देशाची बाजू आणि त्यांची तयारी कशी आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.