PAK vs AFG: आसिफ अली आशिया कपमधून बाहेर जाण्याची शक्यता? तात्काळ बंदीची मागणी
त्याचबरोबर काल दोन्ही संघातील प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सुध्दा उजेडात आला आहे.
काल अफगाणिस्तान (AFG) आणि पाकिस्तान (PAK) यांच्यात रोमांचक सामना झाला. त्यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. कालच्या सामन्यातील अधिक व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्हायरल केले आहेत. पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली (Asif Ali) बाद झाल्यानंतर त्याने अफगाणिस्तानच्या संघातील गोलंदाजावरती बॅट उचलली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा ठरला आहे. त्यावेळी तिथं असणाऱ्या खेळाडूंनी आसिफ अली याला अडवल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
The fight between Asif Ali and the Afghan bowler? Very unfortunate
हे सुद्धा वाचा#PAKvAFG pic.twitter.com/45i0MJaBHs
— Rana Raheel Abbas (@RanaRaheelAbbas) September 7, 2022
अंतिम ओव्हर संघर्ष
अंतिम ओव्हर सुरु असताना दोन्ही खेळाडूंमध्ये संघर्ष सुरु झाला होता. कारण पाकिस्तान संघाच्या विकेट पडत होत्या आणि अफगाणिस्तानचा संघ विजयाच्या दिशेने घौडदौड करीत होता. त्यावेळी फरीद अहमद मलिकच्या गोलंदाजीवर आसिफ अली चुकीचा फटका मारून बाद झाला. त्यावेळी दोघांमध्ये संघर्ष झाला.
यांनी केली बंदीची मागणी
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आसिफ अलीने बॅट मारण्याचा प्रयत्न केला म्हणून बंदीची मागणी केली आहे. काल हे प्रकरण झाल्यानंतर संपुर्ण देशातून असिफ अलीवरती टीका करण्यात आली. हा खेळ असल्याने अशा गोष्टी होत राहतात असं देखील काही लोकांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.
पाकिस्तानी प्रेक्षकांना मारहाण
त्याचबरोबर काल दोन्ही संघातील प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सुध्दा उजेडात आला आहे. पाकिस्तानी प्रेक्षकांना मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या अधिक चर्चेत आहे.