AUS vs IND, 2nd Test | अश्विनचं रवी शास्त्रींच्या पावलावर पाऊल, तब्बल 35 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये धमाका

अश्विनने Boxing Day Test च्या पहिल्या डावात एकूण 24 ओव्हर टाकल्या. यामध्ये त्याने 35 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या.

AUS vs IND, 2nd Test | अश्विनचं रवी शास्त्रींच्या पावलावर पाऊल, तब्बल 35 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये धमाका
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 3:52 PM

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी (Boxing Day Test) सामन्यातील पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना 195 धावांवर ऑल आऊट केलं. कांगारुंना 200 च्या आत रोखण्यात गोलंदाजांचा मोलाचा वाटा राहिला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमरहाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच फिरकीपटू आर अश्विनने (Ashwin) 3 विकेट्स घेतल्या. यासह अश्विनने रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या 35 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (aus vs ind 2nd test r ashwin equals ravi shastri 35 year old record in melbourne)

काय आहे विक्रम?

अश्विनने पहिल्या डावात एकूण 24 ओव्हर टाकल्या. यामध्ये त्याने 7 ओव्हर निर्धाव टाकल्या. तर 35 धावा देत महत्वाच्या 3 विकेट्सही घेतल्या. यामध्ये स्टीव्ह स्मिथ, कर्णधार टीम पेन आणि मॅथ्यू वेडच्या समावेशचा समावेश होता. मेलबर्न कसोटीत सामन्यात पहिल्या दिवशी 3 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा अश्विन हा रवी शास्त्री यांच्या नंतरचा फिंगर स्पीनर आहे. शास्त्री यांनी 35 वर्षांपूर्वी म्हणजेच 1985 मध्ये कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

अश्विन 2015 नंतरचा यशस्वी कसोटी गोलंदाज

अश्विन कसोटी क्रिकेटमधील जागतिक पातळीचा फिरकीपटू आहे. अश्विन 2015 नंतर किमान 25 टेस्ट खेळणाऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा फिरकीपटू आहे. या दरम्यान अश्विनने एकूण 50 कसोटी सामन्यात 260 विकेट्स घेतल्या आहेत. तर त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटून नॅथन लायनने 60 कसोटींमध्ये 257 विकेट्स घेतल्या आहेत.

पहिल्या दिवसाचा आढावा

ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. टीम इंडियाच्या आक्रमक माऱ्यासमोर कांगारुंचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडियात फलंदाजीसाठी आली. टीम इंडियाने पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मंयक अग्रवालची विकेट गमावली. मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची 36-1 अशी धावसंख्या होती. पुजारा आणि गिल नाबाद आहेत.

संबंधित बातम्या :

AUS v IND, 2nd Test | कर्णधार अजिंक्य रहाणेचे डॅशिंग निर्णय, बॉक्सिंग डे कसोटीत दमदार नेतृत्त्व

AUS vs IND, 2nd Test | शुभमन गिल-मोहम्मद सिराजचे ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी पदार्पण

AUS vs IND, 2nd Test | अश्विनच्या फिरकीवर फसला, स्टीव्ह स्मिथच्या नावे नकोसा विक्रम

aus vs ind 2nd test r ashwin equals ravi shastri 35 year old record in melbourne

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.