AUS vs Ind, 3rd Test | स्टार्कचा बंदोबस्त कसा करायचं? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा मेगाप्लॅन

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरी कसोटी 7 जानेवारीला सिडनीत खेळण्यात येणार आहे.

AUS vs Ind, 3rd Test | स्टार्कचा बंदोबस्त कसा करायचं? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा मेगाप्लॅन
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जानेवारी 2021 ला सिडनी क्रिकेट ग्राऊडवर तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 12:56 PM

सिडनी : भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने पराभव (Australia vs India 2nd Test) केला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-1 ने बरोबरी केली. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. मात्र यानंतर दुसऱ्या सामन्यात जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत आणि नवख्या खेळाडूंसह रहाणेने शानदार नेतृत्व केलं. क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाकडून अशीच कामगिरी तिसऱ्या कसोटीत अपेक्षित असणार आहे. या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियामध्ये काही बदलांची शक्यता आहे. टीम इंडियाचा नक्की काय प्लॅन असू शकतो, यावर आपण एक नजर टाकुयात. (aus vs ind 3rd test big plan of team india against mitchell starc)

स्टार्कविरोधात तगडी रणनीती

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कपासून सावध रहावे लागणार आहे. स्टार्कने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात प्रत्येकी 4 अशा एकूण 8 विकेट्स घेतल्या.  यामध्ये त्याने टीम इंडियाच्या महत्वाच्या फलंजदाजांना बाद केलं.

पॅट कमिन्सचा भेदक मारा

वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सही या कसोटी मालिकेत शानदार गोलंदाजी करतोय. कमिन्सच्या अचूक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज अपयशी ठरले. कमिन्सने 2 कसोटींमध्ये एकूण 10 फलंदाजांना बाद केलं आहे. यामुळे टीम इंडियाचं स्टार्क आणि पॅटविरोधात कसा सामना करायचा, याबाबत  मेगा प्लॅन असणार आहे.

मालिकेचा दृष्टीने तिसरा सामना निर्णायक

दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका आहे. यामुळे तिसरा सामना हा दोन्ही संघांसाठी मालिकेच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ जोरदार कामगिरी करतील.

रोहित तिसऱ्या सामन्यात खेळणार?

साधारणपणे विनिंग प्लेइंग इलेव्हन टीममध्ये बदल केला जात नाही. मात्र तिसऱ्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माचे (Rohit Sharma) पुनरागमन होणार आहे. मात्र रोहितच्या खेळण्याबाबत अजूनही कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रोहितला  तिसऱ्या सामन्यात मयंकला वगळून घेतले जाऊ शकते. मयंक अग्रवालने पहिल्या 2 कसोटीत निराशाजनक कामगिरी.

उमेश यादव दुखापतग्रस्त

या दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाज उमेश यादवला (Umesh Yadav) रनअप दरम्यान दुखापत झाली. यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. उमेशच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून कोणतीच माहिती दिली नाहीये. यामुळे तिसऱ्या सामन्यात उमेशच्या खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. दुर्देवाने उमेशला या सामन्याला किंवा मालिकेला मुकावे लागले, तर नवदीप सैनीला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते.

तिसरा सामना नियोजित वेळापत्रकानुसार

तिसरा सामना नियोजित वेळापत्रकानुसार सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे, याबातची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने मंगळवारी 29 डिसेंबरला दिली. गेल्या काही दिवसांपासून सिडनीमध्ये काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले होते. यामुळे तिसरा सामना सिडनीत होणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती. मात्र ऑस्ट्रेलिया बोर्डाने दिलेल्या उत्तरामुळे या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे .

संबंधित बातम्या :

AUS vs IND, 2nd Test 4th Day : टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने शानदार विजय

(aus vs ind 3rd test big plan of team india against mitchell starc)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.