Aus vs Ind 3rd Test | रिषभ पंतची दुखापत साधारण, भारतासाठी दिलासादायक बातमी

पंतला पहिल्या डावात फलंदाजी करताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर दुखापत झाली होती.

Aus vs Ind 3rd Test | रिषभ पंतची दुखापत साधारण, भारतासाठी दिलासादायक बातमी
पंतला पहिल्या डावात फलंदाजी करताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर दुखापत झाली होती.
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 7:13 PM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना (Aus vs Ind 3rd Test) खेळण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडिया पिछाडीवर आहे. त्यात टीम इंडियाच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जाडेजा अंगठ्याच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही चिंता वाढवणारी बातमी ठरली. अशातच टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. रिषभ पंतला (Rishabh Pant Injurey) झालेली दुखापत फार गंभीर नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पंतला या तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात फंलदाजी करता येणार आहे. (aus vs ind 3rd test big update on rishabh pant left elbow injurey)

पंतला पहिल्या डावात फंलदाजीदरम्यान दुखापत झाली होती. यानंतर पंतचा स्कॅन रिपोर्ट करण्यात आला. यामध्ये ही दुखापत फार गंभीर नसल्याचं समोर आलं. पंतला पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर डाव्या कोपऱ्याला दुखापत झाली.

पॅटने टाकलेला चेंडू बाऊन्सर येईल, असं पंतला वाटलं. पण पंतचा अंदाज चुकला. चेंडू बाऊन्स झालाच नाही. यामुळे तो चेंडू पंतच्या डाव्या कोपऱ्याला लागला. पंतला झालेल्या या दुखापतीमुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला होता. पंतवर वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार केले. यानंतर पंतने पुन्हा खेळायला सुरुवात केली. या दुखापतीनंतरही पंतने झुंजार खेळी केली. पंतने 67 चेंडूत 4 चौकारांसह 36 धावांची झुंजार खेळी केली.

यानंतर दुसऱ्या डावात पंतऐवजी बदली खेळाडू म्हणून रिद्धीमान साहा विकेटकीपिंग करण्यासाठी आला. यामुळे पंतला असलेली दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता स्कॅन रिपोर्टमुळे या सर्व प्रकाराला पूर्णविराम मिळाला आहे.

जाडेजा मालिकेबाहेर

दरम्यान रवींद्र जाडेजाला दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. जाडेजाला पहिल्या डावात फंलदाजीदरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर जाडेजाच्या अंगठ्याचा स्कॅन रिपोर्ट करण्यात आला. या रिपोर्टमध्ये जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचं निदान झालं. तसंच अंगठ्याची हड्डी सरकल्याचंही समोर आलं. यामुळे जाडेजाला मालिकेबाहेर व्हावे लागले आहे. मात्र जाडेजाच्या दुखापतीबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या

Aus vs Ind 3rd Test | टीम इंडियासाठी वाईट बातमी, रिषभ पंत दुखापतग्रस्त

Aus vs Ind 3rd Test | टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा मालिकेबाहेर

(aus vs ind 3rd test big update on rishabh pant left elbow injurey)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.