AUS vs IND 3rd Test | तिसऱ्या कसोटीत डेव्हिड वॉर्नर अपयशी, नकोशा विक्रमाची नोंद
डेव्हिड वॉर्नरने टीम इंडियाविरोधातील तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 5 धावा केल्या.
सिडनी : ऑस्ट्रलिया विरुद्ध टीम इंडिया (AUS vs IND 3rd Test) यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील (border Gavskar Trophy) तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (Dawid Warner) संघात पुनरागमन केलं आहे. वॉर्नर खूप आठवड्यांनी संघात परतला आहे. दुखापतीमुळे वॉर्नर संघाबाहेर होता. पुनरागमनानंतर वॉर्नरकडून ऑस्ट्रेलियाला चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र मोहम्मद सिराजने वॉर्नरला अवघ्या 5 धावांवर बाहेरचा रस्ता दाखवला. सिराजने वॉर्नरला स्लीपमध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट केलं. यासह वॉर्नरच्या नावे लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. (AUS vs IND 3rd Test David Warner sets bad record)
Not the return David Warner would have been hoping for ☝️#AUSvINDpic.twitter.com/vkkUDepl18
— The Cricketer (@TheCricketerMag) January 6, 2021
वॉर्नर ऑस्ट्रेलियामध्ये 25 डावानंतर पहिल्यांदा 10 पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला. यासह वॉर्नरच्या नावे लाजीरवाणा विक्रम झाला आहे. सिडनीमध्ये वॉर्नरने धमाकेदार कामगिरी केली आहे. वॉर्नरने 2015 नंतर 4 शतक आणि 2 अर्धशतकांसह एकूण 14 डावांमध्ये 741 धावा केल्या आहेत. ही आकडेवारी पाहता वॉर्नर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना होती. मात्र सिराजने वॉर्नरला 5 धावांवर बाद केल्याने कांगारुंचा अपेक्षाभंग झाला.
सामन्याचा आढावा
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंजासाठी डेव्हिड वॉर्नर आणि कसोटी पदार्पण केलेला विल पुकोव्हस्की खेळायला आले. मात्र ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट लवकर गमावली. मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला 5 धावांवर आऊट केलं. यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला. लाबुशेन आणि पुकोव्हस्कीने दुसऱ्या विकेटसाठी शानदार भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. या दरम्यान पुकोव्हस्कीने पदार्पणातील सामन्यात अर्धशतक लगावलं. मात्र अर्धशतकानंतर नवदीप सैनीने पुकोव्हस्कीला 62 धावांवर एलबीडबल्यू केलं. यासह सैनीने कसोटीतील पहिली विकेट घेतली.
पावसाचा अडथळा
पावसाने या सामन्यात पहिल्याच दिवशी व्यत्यय आणला. पावसामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागला.
संबंधित बातम्या :
AUS vs IND 3rd Test | राष्ट्रगीत सुरु झालं अन् मोहम्मद सिराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले
AUS vs IND 3rd Test | वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण
(AUS vs IND 3rd Test David Warner sets bad record)