Aus vs Ind 3rd Test | सिडनीत रडीचा डाव, दारु पिऊन बुमराह, सिराजला शिव्या, भारताकडून तक्रार

या सर्व प्रकारानंतर टीम इंडियाने सामनाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे.

Aus vs Ind 3rd Test | सिडनीत रडीचा डाव, दारु पिऊन बुमराह, सिराजला शिव्या, भारताकडून तक्रार
मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 5:49 PM

सिडनी : सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात (Aus vs Ind 3rd Test) तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. साधारणपणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्यात खेळाडू एकमेकांना डिवचतात. यामध्ये काहीवेळा हे खेळाडू शिवीगाळ करतात. मात्र आता क्रिकेट सामना पाहायला आलेल्या चाहत्यांकडून शिवीगाळ तसेच वर्णद्वेषी टीका (Racial Abuse) करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या दोघांना शिव्या दिल्या असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या सर्व प्रकरणाबाबतो टीम इंडियाकडून सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. (aus vs ind 3rd test mohammad siraj and jasprit bumrah racial abuse in sydney cricket ground)

नक्की काय घडलं?

हा सर्व प्रकार सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसातील आहे. एएनआयनुसार, एक क्रिकेट चाहता हा सामना पाहायला आलेला. हा चाहता दारु पिऊन आला होता. या मद्यधुंद चाहत्याने शिवीगाळ केली. या चाहत्याने मोहम्मद सिराजला माकड म्हटल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. तसेच बुमराह आणि सिराजला शिवीगाळ केल्याचं प्रकारही समोर आला. या सर्व प्रकारानंतर टीम इंडियाने सामनाधिकारी डेव्हि बून यांच्याकडे तक्रार करण्यात आली.

या सर्व प्रकारानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अश्विनसह इतर खेळाडूंनी फिल्ड अंपायर यांच्याशी चर्चा केली. यामध्ये शिवीगाळ केल्याचं सांगितले गेलं. यानंतर अंपायर आणि संबंधित यंत्रणेने बुमराह आणि सिराजसोबत चर्चा केली. तसेच यानंतर टीम इंडियाच्या सिक्युरिटी संबंधित अधिकाऱ्यांनी मैदानातील सुरक्षा कर्मीयांसोबत याबाबत विचारणा केली. यावेळेस आयसीसीचे सुरक्षाधिकारीही उपस्थित होते. दरम्यान हा सर्व प्रकार आयसीसीपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय हा आयसीसीचा असणार आहे.

मंकीगेट प्रकरण चर्चेत

यासर्व प्रकरणामुळे 2008 मधील मंकीगेट प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे मंकीगेट प्रकरणही सिडनीतच घडलं होतं. यावेळेस ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सामना खेळला जात होता. ऑस्ट्रेलियाकडून अँड्रयू सायमंड फलंदाजी तर हरभजन सिंह गोलंदाजी करत होता. गोलंदाजीदरम्यान ने हरभजनने माझा 4-5 वेळा (Monkey) माकड असा उल्लेख केला, असा आरोप सायमंडने केला होता. यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. यामुळे हरभजनवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 3rd Test, 3rd Day Highlights : ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत, तिसऱ्या दिवसखेर 197 धावांची आघाडी

(aus vs ind 3rd test mohammad siraj and jasprit bumrah racial abuse in sydney cricket ground)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.