Aus vs Ind 3rd Test | जोरदार कमबॅक दमदार रेकॉर्ड, हिटमॅन रोहित शर्माची विक्रमी कामगिरी
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात 26 धावांची खेळी केली.
सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील (aus vs ind 3rd test) दुसरा दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाने 96 धावा करुन 2 विकेट्स गमावल्या आहेत. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा नाबाद आहेत. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) पुनरागमन केलं. रोहितने एकूण 26 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहितने ऑस्ट्रेलियाविरोधात विक्रमी कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. (aus vs ind 3rd test rohit sharma become first batsman who hit 100 six against australia)
विक्रम काय आहे ?
रोहितने ऑस्ट्रेलियाविरोधात 100 सिक्स मारण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज झाला आहे. रोहितने फिरकीपटू नॅथन लायनच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाविरोधातील 100 वा सिक्स फटकावला. सामन्यातील 16 वी ओव्हर नॅथन लायन टाकत होता. रोहितने या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर शानदार सिक्सर खेचला. यासह रोहितने ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी, टी 20 आणि वनडे अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 100 सिक्स लगावले. तसेच हा सिक्स रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 424 वा सिक्सर ठरला.
हिटमॅनचा ऑस्ट्रेलियाविरोधातील 100 वा सिक्स
@ImRo45 became the first batsman to hit 100 international sixes against Australia with this six off Nathan Lyon. International six No.424 for Rohit Sharma… #AUSvIND pic.twitter.com/aNde0Le5sb
— Sangram Keshori Behera (@BSangramkeshori) January 8, 2021
ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक सिक्सर मारणारे फलंदाज
रोहितनंतर ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत इयोन मॉर्गन दुसऱ्या क्रमांकावर आहे. मॉर्गनने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरोधात 63 सिक्स मारले आहेत.
100 सिक्स – रोहित शर्मा
63 सिक्स – इयोन मॉर्गन
61 सिक्स – ब्रँडन मॅक्युलम
60 सिक्स – सचिन तेंडुलकर
60 सिक्स – महेंद्रसिंह धोनी
सर्वाधिक सिक्सच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानी
सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 424 सिक्स मारले आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल आहे. गेलच्या नावावर एकूण 534 सिक्सची नोंद आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे. आफ्रिदीने एकूण 476 सिक्स फटकावले आहेत.
सामन्याचा धावता आढावा
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 338 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 131 धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने 91 धावा केल्या. टीम इंडियाकडून फिरकीपटू रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर स्टीव्ह स्मिथला रन आऊट केलं. तर जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 2 विकेट्स घेत जाडेजाला चांगली साथ दिली. तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. दरम्यान दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाने 2 बाद 96 धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या :
Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत विक्रमाची संधी
(aus vs ind 3rd test rohit sharma become first batsman who hit 100 six against australia)