Aus vs Ind 4th Test | “ना खंत ना खेद” ! गावसकरांच्या टीकेला हिटमॅन रोहित शर्माचे प्रत्युत्तर

| Updated on: Jan 16, 2021 | 5:52 PM

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियविरोधातील चौथ्या सामन्यातील पहिल्या डावात 44 धावांवर बाद झाला. यावरुन लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी टीका केला होती.

Aus vs Ind 4th Test | ना खंत ना खेद ! गावसकरांच्या टीकेला हिटमॅन रोहित शर्माचे प्रत्युत्तर
हिटमॅन रोहित शर्मा
Follow us on

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 4th Test) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातील टीम इंडियाच्या पहिल्या डावात रोहित शर्मा (Rohit Sharma) 44 धावांवर बाद झाला. यावरुन रोहितवर टीका करण्यात आली. लिटील मास्टर सुनील गावसकर (little master Sunil Gavskar) यांनीही रोहितला लक्ष्य केलं. रोहित फार बेजबाबदारपणे आऊट झाला. त्याला कोणतेही कारण देता येणार नाही, अशा शब्दात गावसकर यांनी टीका केली. या टीकेवर रोहितने प्रतिक्रिया दिली आहे. रोहित ज्या प्रकारे बाद झाला, त्यावरुन अनेक क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. मैदानात सेट झाल्यानंतरही रोहितने फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. यामुळे सर्व चाहते रोहितवर नाराज झाले आहेत. मात्र रोहितने याबाबत स्पष्टीकरण देत आपली बाजूी मांडली आहे. (aus vs ind 4th test hitman rohit Sharma reply to the critics)

रोहित काय म्हणाला?

“मी आज ज्या प्रकारे खेळलोय, त्यासाठी मी समाधानी आहे. नॅथनने टाकलेला चेंडूचा टप्पा माझ्या बॅटवर अचूक बसला. पण मी अपेक्षित फटका मारण्यात अपयशी राहिलो. मला लॉंग ऑन आणि डीप स्केवअर लेगच्या फिल्डरमधून फटका मारायचा होता, मात्र मी त्यात अपयशी ठरलो. परिणामी मी बाद झालो. मात्र मी जसा खेळलो त्याबाबत मी समाधानी आहे”, अशी प्रतिक्रिया रोहितने दिली. रोहित व्हडिओ कॉनफरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित होता. यावेळेस त्याने याबाबत प्रतिक्रिया दिली.

त्या फटक्याबाबत खेद नाही.

“ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा माझा प्रयत्न होता. या प्रयत्नात मी तो फटका मारला. मी बाद झालो. मात्र मला याबाबत अजिबात खंत नाही, असं रोहितने नमूद केलं. “मी काही ओव्हर खेळलो. चेंडू स्विंग होत नसल्याचं मला जाणवलं. त्यामुळे मी गिअर चेंज (फटकेबाजी) करण्याच्या मानसिकतेत होतो. मला गोलंदाजांवर दबाव निर्माण करायला आवडतं आणि माझी तिच भूमिका आहे”, असं रोहितने स्पष्ट केलं

नक्की काय घडलं?

कांगारुंचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात झाली. मात्र लवकरच शुभमन गिलच्या रुपात पहिला धक्का बसला. यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला.रोहितने पुजारासह चांगली खेळी केली. रोहित मैदानात सेट झाला होता. रोहित चांगला खेळत होता. उत्तमप्रकारे कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करत होता. नॅथन लायन टीम इंडियाच्या डावातील 20 वी ओव्हर टाकायला आला.

या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर रोहितने फटका मारण्याच्या प्रयत्न केला. मात्र तो फटका चुकीच्या दिशेला गेला. तिथे असलेल्या मिचेल स्टार्कने चूक न करता रोहितचा कॅच घेतला. त्यामुळे रोहित 44 धावांवर आऊट झाला.

गावसकर काय म्हणाले होते?

“डीप सक्वेअर आणि लॉंग ऑनला फिल्डर होते. यानंतरही असा फटका मारण्याची काय गरज होती, अस म्हणत गावसकरांनी नाराजी व्यक्त केली. आधीच्या चेंडूवर फोर मारला होता. त्यामुळे लगेगच शॉट मारण्याची आवश्यकता नव्हती. गरज नसताना रोहितने आपली विकेट गमावली. रोहित फार बेजबाबदारपणे बाद झाला. आता कारण देऊन चालणार नाही”, अशा शब्दात गावकरांनी रोहितवर टीका केली.

दुसऱ्या दिवसाच्या चहापानानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ होऊ शकला नाही. दरम्यान टीम इंडियाने चहापानापर्यंत 2 विकेट्स गमावून 62 धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा नाबाद आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. यामुळे दुसऱ्या दिवसातील अपेक्षित षटकांचा खेळ होऊ शकला नाही. ही भरपाई भरुन काढण्यासाठी उद्या 17 जानेवारीला तिसऱ्या दिवसाच्या खेळाला लवकर सुरुवात केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Rohit Sharma | सेहवाग बनने का शौक है? हिटमॅन रोहित शर्मा ट्रोल

Aus vs Ind, 4th Test | नटराजन आणि वॉशिंग्टनचा कारनामा, पदार्पणात अफलातून कामगिरी

Aus vs Ind 4th Test | वॉशिंग्टन ‘अतिसुंदर’, पदार्पणातील सामन्यात विक्रमाला गवसणी

(aus vs ind 4th test hitman rohit Sharma reply to the critics)