Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत विक्रमाची संधी

ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरी कसोटी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर 7 जानेवारीपासून खेळण्यात येणार आहे.

Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत विक्रमाची संधी
हिटमॅन रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 10:52 AM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India Test Series) यांच्यातील कसोटी मालिकेतील 2 सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी1 सामना जिंकला आहे. यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. या मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) खेळण्यात येणार आहे. या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी हिटमॅन रोहित शर्माचं (Rohit Sharma) पुनरागमन झालं आहे. रोहितला ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत विक्रमाची संधी आहे. रोहित या विक्रमापासून केवळ एक पाऊल दूर आहे. (aus vs ind test series 2020 rohit sharma has a chance to complete 100 sixes against australia)

काय आहे विक्रम?

रोहितला ऑस्ट्रेलियाविरोधात 100 सिक्स लगावण्याची संधी आहे. रोहितने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरोधात एकूण 99 सिक्स ठोकले आहेत. यामुळे रोहित 1 सिक्स लगावताच षटकारांचं शतक पूर्ण होईल. तसेच रोहित यासह अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरेल. तसेच ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक सिक्स मारण्याबाबत दुसऱ्या क्रमांकावर इयोन मॉर्गन आहे.

सर्वाधिक सिक्सच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानी

सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 423 सिक्स मारले आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल आहे. गेलच्या नावावर एकूण 534 सिक्सची नोंद आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे. आफ्रिदीने एकूण 476 सिक्स फटकावले आहेत.

रोहितच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी

या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी रोहितच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली भारतात परतला. त्यामुळे उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व दिलं आहे. यामुळे रोहितला उपकर्णधारपदाची धुरा दिली आहे.

संबंधित बातम्या :

Ind vs Aus: मेलबर्न रेस्टॉरंट प्रकरणानंतर टीम इंडियाची कोरोना टेस्ट, रोहित-पंतचा रिपोर्ट काय?

Rohit Sharma | बीफ खाल्ल्याने टीम इंडियाचे खेळाडू सोशल मीडियावर ट्रोल

(aus vs ind test series 2020 rohit sharma has a chance to complete 100 sixes against australia)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.