T Natrajan | “नटराजन प्रतिभावान खेळाडू, पण कसोटीत किती यशस्वी होईल माहिती नाही : डेव्हिड वॉर्नर

| Updated on: Jan 02, 2021 | 1:12 PM

ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीत उमेश यादवला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागले. त्यामुळे उमेशच्या जागी नटराजनला कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे.

T Natrajan | नटराजन प्रतिभावान खेळाडू, पण कसोटीत किती यशस्वी होईल माहिती नाही : डेव्हिड वॉर्नर
थंगारासू नटराजनला ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात संधी देण्यात आली आहे.
Follow us on

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia vs India Test Series) मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) दुखापतग्रस्त झाला. या दुखापतीमुळे उमेशला कसोटी मालिकेला मुकावे लागले. भारतीय संघात उमेशच्या जागी यॉर्कर किंग थंगारासू नटराजनला संधी देण्यात आली. नटराजनला तिसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते. नटराजनला टीम इंडियात संधी दिल्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) प्रतिक्रिया दिली आहे. (aus vs ind test series david warner is not sure how successful t natarajan will be in test cricket)

वॉर्नर काय म्हणाला?

“नटराजनला कसोटी संघात समाविष्ठ केल्याने मी आनंदी आहे. वॉर्नरने नटराजनमध्ये असलेल्या गुणांचं कौतुक केलं. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने एकाच लाईनवर गोलंदाजी करावी लागते. नटराजन असं सातत्याने करु शकेल का”, वॉर्नरने अशी शंका व्यक्त केली. “नटराजन कसोटीत कितपत यशस्वी होईल, याबाबत अनिश्चितता आहे. नटराजन प्रतिभावान आहे. पण कसोटीत सलग गोलंदाजी करावी लागते. तो सलग गोलंदाजी करु शकेल का, याबाबत मला हमी नाही”, असंही वॉर्नर म्हणाला. आयपीएलच्या 13 व्या मोसमात नटराजन वॉर्नरच्या नेतृत्वात खेळला होता. त्यामुळे वॉर्नरला नटराजनच्या गोलंदाजीबाबत माहिती आहे.

नशीबवान नटराजन

नटराजनला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली, तर त्याच्यासारखा नशीबवान खेळाडू तोच असेल. खरंतर नटराजनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड केली नव्हती. मात्र इतर खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्यामुळे थंगारासूला संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरोधातील टी 20 मालिकेसाठी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी मिळाली. मात्र वरुण दुखापतग्रस्त झाल्याने त्याला मालिकेला मुकावे लागले. त्यामुळे टी 20 मालिकेत वरुणच्या जागी नटराजनला संधी मिळाली.

यानंतर एकदिवसीय मालिकेत नटराजनला नवदीप सैनीचा बॅकअप खेळाडू म्हणून नटराजनला संधी मिळाली. त्यानंतर नटराजनला एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पणाची संधी मिळाली. त्याने पदार्पणातील सामन्यात चमकदार कामगिरी केली. दरम्यान आता उमेश यादव दुखापत झाल्याने कसोटीसाठी नटराजनला संधी मिळाली आहे. त्यामुळे नटराजनला कसोटीत पदार्पणाची संधी मिळते का, हे पाहणं अधिक औत्सुक्याचं असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरी कसोटी 7 जानेवारीला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

उमेश यादव कसोटी मालिकेतून बाहेर, युवा यॉर्कर किंगची टीम इंडियात निवड

IPL 2020 : हैदराबादच्या ताफ्यातील नव्या यॉर्कर किंगचा उदय, थंगारासू नटराजनने ट्रेन्ट बोल्ट, जेसन होल्डरला पछाडलं

(aus vs ind test series david warner is not sure how successful t natarajan will be in test cricket)