T Narajan | ‘यॉर्कर किंग’ थंगारासू नटराजन कसोटी पदार्पणासाठी सज्ज, सरावादरम्यान भन्नाट कॅच
थंगारासून नटराजनला दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
मेलबर्न : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (australia vs india test series) यांच्यात कसोटी मालिका खेळण्यात येत आहे. आतापर्यंत या मालिकेतील 2 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर 7-11 जानेवारीदरम्यान खेळण्यात येणार आहे. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (umesh yadav) दुसऱ्या कसोटीदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले. त्यामुळे त्याजागी थंगारासू नटराजनला (Thangaasu Natrajan) संधी देण्यात आली. नटराजनला तिसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते. या पार्श्वभूमीवर नटराजन जोरदार सराव करत आहे. (aus vs ind test series thanagarasu natrajan take super catch during practice session)
नटराजनचा भन्नाट झेल
बीसीसीआयने नटराजनचा कॅच घेतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. नटराजनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओत नटराजनने उलट्या दिशेने धावत अप्रतिम कॅच घेतला. यावेळेस मैदानात टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर उपस्थित होते.
@Natarajan_91 has been grabbing his chances very well on this tour. ?? #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/sThqgZZq1k
— BCCI (@BCCI) January 3, 2021
दुखापत नटराजनच्या पथ्यावर
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधीपासून टीम इंडियामागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. मात्र ही दुखापत नटराजनच्या पथ्यावर पडली. इतर खेळाडूंच्या दुखापतीमुळे नटराजनला ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. मुळात नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. मात्र सुदैवाने त्याला खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी फिरकीपटू वरुण चक्रवर्थी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे टी 20 मालिकेत चक्रवर्थीच्या जागी नटराजनला संघात समाविष्ठ करण्यात आलं. तसेच त्याला टी 20 मध्ये पदार्पणाची संधीही मिळाली.
NEWS: T Natarajan to replace Umesh Yadav in India’s Test squad. #TeamIndia #AUSvIND
Details ? https://t.co/JeZLOQaER3 pic.twitter.com/G9oXK5MQUE
— BCCI (@BCCI) January 1, 2021
नटराजनसोबत हाच प्रकार एकदिवसीय मालिकेत घडला. नवदीप सैनीचा बॅकअप खेळाडू म्हणून संघात स्थान मिळालं. यानंतर त्याने एकदिवसीय मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. नटराजनने एकदिवसीय आणि टी 20 मध्ये मिळालेल्या संधीचं सोनं केलं. दरम्यान आता नटराजनला ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळते का, हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे.
नटराजन खऱ्या अर्थाने आयपीएलच्या 13 व्या मोसमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. नटराजनने एलिमिनेटर सामन्यात ‘मिस्टर 360’ एबी डी व्हीलियर्सला यॉर्कर चेंडूवर बोल्ड केलं. नटराजनने आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादसाठी निर्णायक भूमिका बजावली. तसेच आयपीएलच्या या मोसमामुळे टीम इंडियाला नवा ‘यॉर्कर किंग’ गोलंदाज मिळाला.
संबंधित बातम्या :
T Natrajan | “नटराजन प्रतिभावान खेळाडू, पण कसोटीत किती यशस्वी होईल माहिती नाही : डेव्हिड वॉर्नर
PHOTO | एकीकडे विजयाचा जल्लोष, दुसरीकडे पुत्रप्राप्तीचा आनंद, हैदराबादचा गोलंदाज बाबा बनला
(aus vs ind test series thanagarasu natrajan take super catch during practice session)