Aus vs Ind, 4th Test | चौथ्या कसोटीआधी कांगारुंना मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

चौथा कसोटी सामना 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये खेळण्यात येणार आहे.

Aus vs Ind, 4th Test | चौथ्या कसोटीआधी कांगारुंना मोठा धक्का, 'हा' खेळाडू संघाबाहेर
ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोव्हसकी चौथ्या कसोटीबाहेर.
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 12:01 PM

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind, 4th Test) यांच्यात 15 जानेवारीपासून चौथा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना ब्रिस्बेनमध्ये (Brisbane Test) खेळला जाणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोव्हसकी (Will Pucovski) चौथ्या कसोटीबाहेर झाला आहे. पुकोव्हसकीच्या जागी मार्कस हॅरिसला (Marcus Harris) संधी देण्यात आली आहे. आयीसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (aus vs ind Will Pucovski has been ruled out of 4th Test)

पुकोव्हस्कीने भारताविरोधातील सिडनीतील तिसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं होतं. या पदार्पणातील सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावलं होतं. मात्र आता पुकोव्हस्कीने बाहेर झाला आहे. यामुळे चौथ्या कसोटीत कांगारुंची सलामीला नवी जोडी दिसणार आहे.

पुकोव्हस्की फिटनेस चाचणीत अपयशी

पुकोव्हस्कीचं गुरुवारी 14 जानेवारीला फिटनेस चाचणी करण्यात आली. यामध्ये तो अपयशी ठरला. पुकोव्हस्कीला खांद्यात दुखापत झाली आहे. पुकोव्हस्कीला ही दुखापत सिडनी कसोटीत झाली होती. या दुखापतीमुळे मार्कस हॅरिसला संधी मिळाली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस ही जोडी चौथ्या कसोटीत सलामीला येण्याची शक्यता आहे.

मोठ्या काळानंतर संधी

मार्कस हॅरिसला वर्षभराच्या अतंराने संघात संधी देण्यात आली आहे. हॅरिस 2019 पासून कसोटी खेळला नाही. मार्कस हॅरिसला एशेस मालिके कॅमरुन बॅनक्राफ्टच्या जागी संधी देण्यात आली होती. यामध्ये त्याने 6 डावांमध्ये 58 धावा केल्या होत्या. मार्कसची भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली नव्हती. मात्र पुकोव्हसकी आणि वॉर्नरच्या दुखापतीनंतर अॅडिलेड आणि मेलबर्न कसोटीसाठी मार्कसला संघात समाविष्ट करण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या कसोटीच जो बर्न्सला दुखापत झाली. यामुळे मार्कसला संपूर्ण मालिकेत संधी मिळाली.

मालिका 1-1 ने बरोबरीत

बॉर्डर-गावसकर मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने आणि टीम इंडियाने अनुक्रमे पहिला आणि दुसरा कसोटी सामना जिंकला आहे. तर तिसरा सामना हा अनिर्णित राहिला. त्यामुळे 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी स्थिती आहे. यामुळे चौथा कसोटी सामना हा चुरशीचा होणार आहे. हा तिसरा सामना 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Hanuma Vihari | हनुमा विहारीचे भाजप खासदाराला सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाला…

(aus vs ind Will Pucovski has been ruled out of 4th Test)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.