AUS vs IND, 2nd Test | टीम इंडियाच्या विजयाची 5 प्रमुख कारणं
टीम इंडियाच्या खेळाडूंनी या सामन्यात बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाडींवर दमदार कामगिरी केली.
मेलबर्न : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (AUS vs IND, 2nd Test) मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले 70 धावांचे माफक आव्हान भारतीय फलंदाजांनी अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. टीम इंडियाने या सामन्यात सर्वच आघाडीवर धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडियाच्या दुसऱ्या सामन्यातील विजयाची 5 प्रमुख कारणं पाहणार आहोत. (aus vs india 2nd test 2020 at mcg Top 5 reasons for Team Indias victory)
रहाणेची शतकी खेळी आणि भागीदारी
टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने या सामन्यात शानदार कामगिरी केली. रहाणेने पहिल्या डावात शानदार 112 धावांची शतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात नाबाद 27 धावा केल्या. रहाणेने कर्णधाराची भूमिका अत्यंत जबाबदारीने आणि चोखपणे पार पाडली. रहाणेने पहिल्या डावात चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी हनुमा विहारी आणि रिषभ पंतसह अर्धशतकी भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाला स्थिरता मिळाली. तसेच आघाडी घेण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.
जाडेजाला संधी देण्याचा निर्णय योग्य
दुसऱ्या कसोटीत रहाणेने विराट कोहलीच्या जागी अष्टपैलू रवींद्र जाडेजाला संधी दिली. रहाणेचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. जाडेजाने बॅटिंगसह बोलिंगनेही चमकदार कामगिरी केली. रहाणे आणि जाडेजा या जोडीने पहिल्या डावात सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी या निर्णायक ठरली. या भागीदारीमुळे टीम इंडियाला 131 धावांची आघाडी मिळाली. तसेच जाडेजाने गोंलदाजी करताना पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 3 विकेट्स मिळवल्या.
पदार्पणात शानदार कामगिरी
शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोन्ही खेळाडूंचा हा पदार्पण सामना होता. या दोघांनी या सामन्यात चांगली कामगिरी केली. युवा शुभमन गिलने पहिल्या डावात झुंजार 45 तर दुसऱ्या डावात नाबाद 35 धावा केल्या. शुभमन गिलने आपली भूमिका अगदी उत्तमरित्या पार पाडली. तसेच बोलर मोहम्मद सिराजने मिळालेल्या संधीची चांगलाच फायदा उचलला. सिराजने पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 3 अशा एकूण 5 फलंदाजांना बाद केलं.
गोलंदाजांचा भेदक मारा
या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी महत्वाची भूमिका पार पाडली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना मैदानात सेट होऊ दिले नाही. तसेच निर्णायक क्षणी विकेटेस मिळवल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला टीम इंडियावर वरचढ होता आले नाही. वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही गोंलदाजांनी जानदार बोलिंग केली. बुमराहने या सामन्यात एकूण 6, मोहम्मद सिराजने 5, उमेश यादवने 1, आश्विनने 5 तर जाडेजाने एकूण 3 विकेट्स मिळवल्या.
उत्तम क्षेत्ररक्षण
भारतीय खेळाडूंनी या सामन्यात जोरदार फिल्डिंग केली. रवींद्र जाडेजाने पहिल्या डावात मॅथ्यू वेडचा शानदार कॅच घेतला. ही कॅच घेण्यासाठी शुभमन गिल आणि जाडेजा यांच्यात टक्कर झाली. मात्र जाडेजाने अचूक झेल टिपला. तसेच या संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंनी शानदार फिल्डिंग केली.
जाडेजाने घेतलेल्या अफलातून कॅच
Almost disaster! But Jadeja held his ground and held the catch! @hcltech | #AUSvIND pic.twitter.com/SUaRT7zQGx
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2020
संबंधित बातम्या :
AUS vs IND, 2nd Test | रहाणे बडे दिलवाला ! अजिंक्य रन आऊट झाल्यानंतर मैदानात काय झालं? वाचा सविस्तर
(aus vs india 2nd test 2020 at mcg Top 5 reasons for Team Indias victory)