Aus vs Ind 4th Test | चिडखोर कांगारु ! बॅटिंगदरम्यान ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मला डिवचत होते, शार्दूल ठाकूर म्हणाला…

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. कांगारुंनी फलंदाजी करताना डिवचलं, असं शार्दुल ठाकूरने सांगितलं.

Aus vs Ind 4th Test | चिडखोर कांगारु ! बॅटिंगदरम्यान ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मला डिवचत होते, शार्दूल ठाकूर म्हणाला...
शार्दुल ठाकूर
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 9:10 AM

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील (Border Gavskar Triphy) चौथा आणि शेवटचा (Aus vs Ind 4th Test) सामना खेळण्यात येत आहे. हा सामना रंगतदार स्थितीत आहे. मालिका बरोबरीत असल्याने या सामन्यात आणखी रंगत वाढली आहे. अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हे चिडखोर स्वभावचे असतात. सामन्यात पिछाडीवर पडल्यास किंवा एखादा फलंदाज डोकेदुखी ठरत असल्यास त्या खेळाडूला डिवचण्याचा प्रयत्न करतात. याच चिडखोर स्वभावाचा प्रचिती आली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मला डिवचत होते, अशी माहिती टीम इंडियाच्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) दिली आहे. (aus vs india 4th test australia player sledge me during batting said shardul thakur)

“ऑस्ट्रेलियाचे खेळाडू माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मी दोनदा त्यांना एका शब्दातच उत्तर दिलं. त्यांनी मला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र मी या प्रकाराकडे दुर्लक्ष करत फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं”, असं शार्दूल म्हणाला. शार्दुल तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाल्यानंतर बोलत होता. यावेळेस त्याने घडल्या प्रकाराची माहिती दिली.

पहिल्या डावात टीम इंडियाने 186 धावांवर 6 विकेट्स गमावल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात मोठी आघाडी मिळण्याची शक्यता होती. मात्र वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुलने टीम इंडियाचा पहिला डाव सावरला. या दोघांनी शानदार भागीदारी केली. ही जोडी कांगारुंसाठी डोकेदुखी सिद्ध होऊ लागली. ही जोडी कांगारुंच्या गोलंदाजांनाही जुमानत नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे स्लेजिंगशिवाय दुसरा पर्याय नव्हता. यामुळे कांगारुंनी शार्दुलला डिवचण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र हा प्रयत्नही अपयशी ठरला.

“टीम इंडिया 6 विकेट्स गमावल्या होत्या. यामुळे आमचं लक्ष हे खेळपट्टीवर टिकून राहण्याचं होत. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज हे थकल्याचं आम्हाला जाणवलं. त्यामुळे मैदानात आणखी वेळ खेळून या गोलंदाजांना आणखी थकवल्यास आपण या सामन्यातील आव्हान कायम राखू शकू”, अशी आमची योजना असल्याची माहिती शार्दुलने दिली.

“आम्ही फंलदाजीसाठी मैदानात आलो तेव्हा कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करत होतो. आम्हा दोघांमध्ये भागीदारी होऊ लागली. त्यानुसार आम्ही फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. गाबाच्या मैदानात चेंडू उसळतो. त्यामुळे गोलंदाजाच्या वाईट चेंडूवर फटके लावायच ठरवलं होतं”, असंही शार्दुलने नमूद केलं.

वॉशिंग्टन आणि शार्दुलची शानदार भागीदारी

टीम इंडियाचे टॉपचे फलंदाज चांगल्या सुरुवातीनंतर झटपट बाद झाले. टीम इंडिया अडचणीत सापडली. मात्र शार्दुल आणि सुंदर या नवख्या जोडीने कांगारुंना तंगवलं. या दोघांनी किल्ला लढवला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान या दोघांनी अर्धशतक लगावलं. शार्दुलने 67 तर सुंदरने 62 धावांची खेळी केली. या दोघांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 336 धावांपर्यंत मजल मारता आली. या दोघांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात केवळ 33 धावांची आघाडी मिळाली.

दरम्यान ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत 4 विकेट्स गमावून 149 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 4th Test, 4th Day Live | ऑस्ट्रेलियाकडे 200 पेक्षा अधिक धावांची आघाडी

(aus vs india 4th test australia player sledge me during batting said shardul thakur)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.