Shardul Thakur | तुला परत मानलं रे ठाकूर, शार्दूलच्या बॅटिंगवर विराट कोहली फिदा, मराठीत कौतुक

शार्दूल ठाकूरने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना झुंजार 67 धावांची खेळी केली होती.

Shardul Thakur | तुला परत मानलं रे ठाकूर, शार्दूलच्या बॅटिंगवर विराट कोहली फिदा, मराठीत कौतुक
टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 2:13 PM

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs  India 4th Test) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) चौथा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. यामुळे टीम इंडियाची 6 बाद 186 अशी स्थिती झाली होती. कांगारुंनी पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या. यामुळे कांगारुंना दुसऱ्या डावात मोठी आघाडी मिळण्याची संधी होती. मात्र मराठामोळ्या शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि पदार्पणातील वॉशिंग्टन सुंदरने (Washinton Sunder) सातव्या विकेटसाठी शानदार 123 धावांची शतकी भागीदारी केली. तसेच वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. या खेळीने टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) शार्दुल ठाकूरचं मराठीत कौतुक केलं आहे. (aus vs india 4th test virat kohli appreciate via tweet to shardul thakur for half century against australia at brisbane)

विराट काय म्हणाला?

“तुला परत मानलं रे ठाकूर”, असं ट्विट करत विराटने ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरचं कौतुक केलं आहे. सोबतच विराटने कसोटी पदार्पण केलेल्या वॉशिग्टंन सुंदरचंही कौतुक केलं आहे. वॉशिंग्टनने शार्दुलसह टीम इंडियाचा डाव सावरला. तसेच पदार्पणातच अर्धशतक झळकावलं. सुंदरने 144 चेंडूत 7 फोर आणि 1 सिक्ससह एकूण 62 धावांची खेळी केली. त्याआधी सुंदरने पहिल्या डावात बोलिंग करताना शानदार 3 विकेट्स घेतल्या.

याआधी अशाच प्रकारे विराटने शार्दुलचं कौतुक केलं होतं. 22 डिसेंबर 2019 ला वेस्टइंडिजविरोधात तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात विंडिजने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला 316 धावांचं आवाहन दिलं होतं. शार्दुलने गोलंदाजी करताना एकूण 1 विकेट घेतली होती. तसेच बॅटिंगनेही निर्णायक भूमिका बजावली होती. सामना रंगतदार स्थितीत होता. भारताला शेवटच्या काही षटकांमध्ये विजयासाठी धावांची आवश्यकता होती.

मात्र शार्दुल ठाकूरने अवघ्या 6 चेंडूत शानदार 17 धावा चोपल्या. शार्दुलने केलेल्या या निर्णायक 17 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाचा विजय झाला होता. या विजयानंतर विराटने शार्दुलसोबतचा एक सेल्फी ट्विट केला होता. “तुला मानला रे ठाकूर” अशा कॅप्शनसह विराटने हा फोटो शेअर केला होता.

दरम्यान या चौथ्य कसोटीतील तिसऱ्या दिवसखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद 21 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे आता कांगारुंकडे एकूण 54 धावांची आघाडी घेतली आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 4th Test | रिषभ पंतची धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी हुकली

Aus vs Ind 4th Test | शार्दूल-वॉशिंग्टनची शानदार खेळी, ब्रिस्बेनवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

विराट मराठीत म्हणाला, “तुला मानला रे ठाकूर”!

(aus vs india 4th test virat kohli appreciate via tweet to shardul thakur for half century against australia at brisbane)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.