INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (INDIA TOUR AUSTRALIA) यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. 27 नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डने टीम इंडियाविरुद्धच्या 4 कसोटी मालिकेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी 29 ऑक्टोबरला एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. Australia have announced their squad for the four-match Test series against India
JUST IN: Australia have announced their Test squad to face India #AUSvIND
Full details: https://t.co/naLfIBuML4 pic.twitter.com/R2zhIR7X0m
— cricket.com.au (@cricketcomau) November 12, 2020
टीम पेन कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियाने या 17 सदस्यीय संघात विल पुकोवस्की आणि कॅमरन ग्रीन यासह वेगवान गोलंदाज सीन एबोट, लेग स्पिनर मिचेल स्वेपसन आणि मायकल नासिर या 5 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एबोटच्या गोलंदाजीवर 2014 मध्ये शेफिल्ड शील्ड या स्थानिक स्पर्धेदरम्यान फिलिप ह्युजचे उसळता चेंडू लागून निधन झाले होते.
विराट कोहली परतणार
टीम इंडियाचा कर्णधार ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एकच सामना खेळणार आहे. त्यानंतर विराट मायदेशी परतणार आहे. विराट जानेवारी महिन्यात बाबा होणार आहे. या अशा महत्वाच्या क्षणी कुटुंबासोबत उपस्थित राहता यावे, यासाठी बीसीसीआयने विराटला पालक्तवाची रजा मंजूर केली आहे.
Family first: India captain Virat Kohli will take paternity leave and fly home after the first Test against Australia for the birth of his first child. https://t.co/vuOzHFYuMH pic.twitter.com/LQSpNUy075
— cricket.com.au (@cricketcomau) November 9, 2020
अखेरीस रोहितला संघात स्थान
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची अखेर कसोटी मालिकेत निवड करण्यात आली आहे. रोहितच्या मेडिकल रिपोर्टनुसार त्याला संघात संधी देण्यात आली आहे. हे नुकतेच बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 29 ऑक्टोबरला भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. यामध्ये हिटमॅनला कोणत्याही मालिकेत स्थान देण्यात आलं नव्हत. रोहितच्या दुखापतीचं कारण देत त्याची निवड केली नाही, असं कारण देण्यात आलं होतं. रोहित शर्माला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती.
आस्ट्रेलिया टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर .
भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
संबंधित बातम्या :
INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा
India Tour Australia | ठरलं! अखेर हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, पण….
australia have announced their squad for the four match test series against india