कॅनबेरा : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा (Boreder Gavaskar Trophy 2020-21) त्यांच्यात भूमित टी 20 आणि कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघावर आजी माजी खेळाडूंकडून सडकून टीका करण्यात आली. या पराभवामुळे टीम पेनचं (Tim Paine) कर्णधारपद धोक्यात आलं. यानंतर आता प्रशिक्षक जस्टिन लँगरचं (Australia Coach Justin Langer) पदही धोक्यात आलं आहे. लँगरच्या पद हे त्यांच्याच खेळाडूंमुळे धोक्यात आलं आहे. खेळाडूंना लँगरच्या प्रशिक्षणाची पद्धत पटत नसल्याचं म्हटलं जात आहे. (australia justin langer coaching post in jeopardy due to internal dispute)
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना लँगरची प्रशिक्षणाची पद्धत पटत नसल्याचे वृत्त सिडनी मॉर्निंग हेरॉल्डने दिलं आहे. तसेच खेळाडूंनी लॅंगरकडून देण्यात येणाऱ्या वागणूकीबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. लँगर ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही प्रकारात प्रशिक्षकापदाची भूमिका पार पाडत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, लँगर तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रशिक्षक पदासाठी पात्र नसल्याचं म्हटलं आहे.
सिडनी मॉर्निंगला ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँगरवर ऑस्ट्रेलियाचे अनेक सीनिअर खेळाडू नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. मनमर्जी कारभारामुळे लँगरवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.
या सर्व बाबतीत लँगरला प्रश्न विचारण्यात आले. यावेळेस लँगरने सर्व वृत्ताचं खंडण केलं. “खेळाडू आणि माझ्यात चांगले संबंध आहेत. माझ्यावर कोणत्याही प्रकारे दबाव नाही. प्रशिक्षक पद हे फार जबाबदारीचं पद आहे. ते मी जबाबदारीने पार पाडतोय”, असं लँगरने स्पष्ट केलं.
दरम्यान ऑस्ट्रेलियाचे 2 संघ हे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड विरुद्ध टी 20 तर आफ्रिके विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
आफ्रिकेविरुद्धातील कसोटी मालिकेसाठी टीम ऑस्ट्रेलिया : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स, सीन एबॉट, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, मोइसेस हेनरिक्स, नॅथन लायन, माइकल नीसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्क स्टीकटी, मिचेल स्वैपसन आणि डेव्हिड वॉर्नर.
न्यूझीलंड दौऱ्यातील टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, एश्टन एगर, जेसन बेहरेनडॉर्फ, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडरमोट, रिले मेरेडिथ, जोश फिलिप, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, तनवीर संघा, डी आर्सी शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, एश्टन टर्नर, एंड्रयू टाय आणि एडम झॅम्पा.
संबंधित बातम्या :
Tim Paine | भारताविरुद्ध लाजिरवाणा पराभव, आता ऑस्ट्रेलियाच्या टीम पेनचं कर्णधारपदच धोक्यात!
पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कोच जस्टीन लँगरला उपरती, म्हणतात ‘आता भारताला कधीच कमी समजणार नाही!’
(australia justin langer coaching post in jeopardy due to internal dispute)