‘अतुल्य भारताचा सन्मान करा’, भारतविरोधी वार्तांकन करणाऱ्या जागतिक मीडियाला मॅथ्यू हेडनने खडसावले
'अतुल्य भारताचा सन्मान करा', असा सल्ला मॅथ्यू हेडनने जगभरातील माध्यमांना दिला आहे. (matthew hayden Attacked World media)
मुंबई : भारत सध्या कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेचा सामना करीत आहे. दररोज लाखो लोकांना या विषाणूची लागण होत आहे, तर हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. जगभरातली माध्यमं भारताच्या कोरोना परिस्थितीचं अतिशय तिखट वार्तांकन करत आहेत. याच माध्यमांना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडनने (matthew hayden) कठोर शब्दात सुनावलं आहे. ‘अतुल्य भारताचा सन्मान करा’, असा सल्ला त्याने जगभरातील माध्यमांना दिला आहे. तसंच तुम्ही भारताची जी निंदा करताय त्याने मला रडू येत येतंय, असं तो म्हणाला. (Australia matthew hayden Attacked World media over Biased Coverage Against india Covid 19)
भारताच्या कठीण काळात, जगभरातून मदतीसाठीचे हात पुढे येत आहेत. भारताशिवाय इतर देशांच्या खेळाडूंनीही मदतीसाठी अनेक पावलं पुढे टाकलीत. खास करुन ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यात मॅथ्यू हेडनचं नाव जोडलं गेलंय. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंजतोय. लाखोंना कोरोनाची लागण होतीय तर शेकडो जीव गमावतायेत. अशा परिस्थितीत हेडनने ऑस्ट्रेलियातील नागरिकांना भारताला मदतीचं आवाहन केलंय.
काय म्हणाला मॅथ्यू हेडन?
भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय, झुंजतोय. भारतात याअगोदर अशी परिस्थिती नव्हती. या कठीण काळात जगभरातील माध्यमं 140 करोड लोकांच्या देशाची निंदा करतायेत, वाट्टेल तसे बोलायला मागेपुढे पाहत नाहीयत. पण मला त्यांना सांगायचंय, की इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात एखादी योजना पोहोचवायची हे खूप मोठं आव्हान आहे. आता तर महामारीचा काळ आहे, अशा शब्दात हेडनने माध्यमांना खडसावलं.
पुढे बोलताना हेडन म्हणाला, “पाठीमागच्या एका दशकापासून मी भारतात जातोय. भारतातल्या अनेक भागांत फिरलोय, खासकरुन तामिळनाडू… ज्या राज्याला मी माझं आध्यात्मिक घर मानतो. इतका विविधतेने नटलेला आणि विशाल देशाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबद्दल माझ्या मनात नेहमीच सर्वोच्च सन्मान राहिलाय”
“भारतात मी जिथंही गेलो तिथे लोकांनी मला खूप प्रेम दिलं, त्यासाठी मी नेहमीच त्यांचा ऋणी राहील. मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की गेल्या काही वर्षात मी भारत अगदी जवळून पाहिला आहे. यावेळी देश केवळ संकटात आहे म्हणून नाही तर माध्यमं सध्या भारताविषयी जे चित्र सांगतायत त्याने मला रडू येतंय. माध्यमांपैकी थोड्याच जणांनी या देशाच्या समस्या समजून घेतल्या असाव्यात किंवा त्यांना माहिती असाव्यात”, अशा कठोर शब्दात हेडनने माध्यमांना सुनावलं.
Extracts from a heartfelt blog on India by @HaydosTweets A cricketer whose heart is even bigger than his towering physical stature. Thank you for the empathy and your affection… pic.twitter.com/h671mKYJkG
— anand mahindra (@anandmahindra) May 14, 2021
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हेडनने घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. तुमच्या सहवेदना आणि भावनांबद्दलआभारी आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
(Australia matthew hayden Attacked World media over Biased Coverage Against india Covid 19)
हे ही वाचा :
‘आपल्या प्रियजणांना जपा’, आईवडिलांचा कोरोनाविरोधात लढा, युजवेंद्र चहलची भावूक पोस्ट
“पृथ्वीकडे ती क्षमता जी सेहवागकडे होती, त्याचा इंग्लंड दौऱ्यात समावेश का नाही?”
‘संघात जर खेळायचं असेल तर बोलिंग करावीच लागेल’, निवड समितीच्या माजी सदस्याकडून हार्दिकला खडेबोल