Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women T20 World Cup मध्ये ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक! तर भारताचं गणित असं असणार

भारतीय महिला संघ टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत चांगलाच फॉर्मात आहे. साखळी फेरीत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला पराभूत करत आगेकूच सुरु केली आहे. आता इंग्लंडविरुद्धचा भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे.

Women T20 World Cup मध्ये ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक! तर भारताचं गणित असं असणार
वुमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये, भारताची एंट्री एक विजय दूरImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 10:21 PM

मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. ‘अ’ गटातून ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. तर दुसऱ्या संघासाठी श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये चुरस निर्माण झाली आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने 3 पैकी 3 सामने जिंकत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. तसेच 6 गुणांची कमाई केली आहे. तर श्रीलंकेनं दोन सामने जिंकत आणि एक सामना गमवत दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेला अजूनही दोन सामने खेळायचे असून एक सामना ऑस्ट्रेलिया, तर दुसरा सामना बांगलादेश सोबत असणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलँड या संघात 19 फेब्रुवारीला शेवटचा साखळी फेरीतला सामना होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेनं बाजी मारली तर थेट उपांत्य फेरीत पोहोचेल. मात्र हरला तर सरासरीवर पुढचं गणित ठरेल. बांगलादेशचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीचा सामना 23 आणि 24 फेब्रुवारीला असणार आहे. तर अंतिम सामना 26 फेब्रुवारी 2023 रोजी रंगणार आहे.

भारताचं उपांत्य फेरीचं गणित कसं ठरणार

भारतानं साखळी फेरीत आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत.पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला पराभूत केलं आहे. आता भाराताचा पुढचा सामना इंग्लंड विरुद्ध 18 मार्च 2022 रोजी होणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे.दुसरीकडे इंग्लंडच्या बाबतही असंच म्हणावं लागेल. दोघांपैकी कोणताही संघ हा सामना हरला तर पुढचा जिंकावाच लागेल. पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जर तर वर अवलंबून आहेत.तर वेस्ट इंडिज आणि आयर्लंडचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

भारतीय संघ- हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे

पुढील सामन्यांचं वेळापत्रक

  • 18 फेब्रुवारी, भारत विरुद्ध इंग्लंड
  • 18 फेब्रुवारी, दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया
  • 19 फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज
  • 19 फेब्रुवारी, न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका
  • 20 फेब्रुवारी, भारत विरुद्ध आयर्लंड
  • 21 फेब्रुवारी, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान
  • 21 फेब्रुवारी, दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश
  • 23 फेब्रुवारी, उपांत्य फेरी
  • 24 फेब्रुवारी, उपांत्य फेरी
  • 26 फेब्रुवारी, अंतिम सामना

टी20 वर्ल्डकपमध्ये या संघांनी जेतेपदावर कोरलं नाव

  • 2009 इंग्लंड (इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँड), इंग्लंडने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
  • 2010 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलँड) ऑस्ट्रेलियाने 3 धावांनी हा सामना जिंकला.
  • 2012 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी हा सामना जिंकला.
  • 2014 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून हा सामना जिंकला.
  • 2016 वेस्ट इंडिज (ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज) वेस्ट इंडिजने 8 गडी राखून सामना जिंकला.
  • 2018 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून हा सामना जिंकला.
  • 2020 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत) ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी हा सामना जिंकला.