मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. ‘अ’ गटातून ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. तर दुसऱ्या संघासाठी श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये चुरस निर्माण झाली आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने 3 पैकी 3 सामने जिंकत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. तसेच 6 गुणांची कमाई केली आहे. तर श्रीलंकेनं दोन सामने जिंकत आणि एक सामना गमवत दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेला अजूनही दोन सामने खेळायचे असून एक सामना ऑस्ट्रेलिया, तर दुसरा सामना बांगलादेश सोबत असणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलँड या संघात 19 फेब्रुवारीला शेवटचा साखळी फेरीतला सामना होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेनं बाजी मारली तर थेट उपांत्य फेरीत पोहोचेल. मात्र हरला तर सरासरीवर पुढचं गणित ठरेल. बांगलादेशचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीचा सामना 23 आणि 24 फेब्रुवारीला असणार आहे. तर अंतिम सामना 26 फेब्रुवारी 2023 रोजी रंगणार आहे.
भारतानं साखळी फेरीत आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत.पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला पराभूत केलं आहे. आता भाराताचा पुढचा सामना इंग्लंड विरुद्ध 18 मार्च 2022 रोजी होणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे.दुसरीकडे इंग्लंडच्या बाबतही असंच म्हणावं लागेल. दोघांपैकी कोणताही संघ हा सामना हरला तर पुढचा जिंकावाच लागेल. पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जर तर वर अवलंबून आहेत.तर वेस्ट इंडिज आणि आयर्लंडचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
भारतीय संघ- हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे