आता ऑस्ट्रेलिया भारतात येणार, मालिकेचं वेळापत्रक जाहीर
मुंबई : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर आता तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया आता भारत दौऱ्यावर येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. या दौऱ्याचं वेळापत्रक बीसीसीआयने जारी केलंय. मायदेशात होणाऱ्या या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-20 सामने आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. टी-20 […]
मुंबई : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर आता तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया आता भारत दौऱ्यावर येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. या दौऱ्याचं वेळापत्रक बीसीसीआयने जारी केलंय.
मायदेशात होणाऱ्या या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-20 सामने आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. टी-20 सामने 24 आणि 27 फेब्रुवारीला अनुक्रमे बंगळुरु आणि विशाखापट्टणममध्ये खेळवण्यात येतील. त्यानंतर हैदराबादमध्ये 2 मार्चपासून पाच सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होईल.
भारतीय संघाचं आगामी वर्ष अत्यंत व्यस्त असणार आहे. आयपीएल, विश्वचषक, परदेश दौरे, मायदेशातील सामने असं हे वेळापत्रक आहे. ऑस्ट्रेलियातील वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ तिथूनच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. मायदेशात परतताच ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरु होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील वन डे मालिका
पहिला सामना – 2 मार्च, हैदराबाद
दुसरा सामना – 5 मार्च, नागपूर
तिसरा सामना – 8 मार्च, रांची
चौथा सामना – 10 मार्च, मोहाली
पाचवा सामना – 13 मार्च, दिल्ली
दरम्यान, यापूर्वी ऑस्ट्रेलियात भारतीय संघ वन डे मालिका खेळणार आहे. पहिला सामना 12 जानेवारी, दुसरा सामना 15 जानेवारी आणि तिसरा सामना 18 जानेवारी रोजी खेळवण्यात येईल. ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ लगेच न्यूझीलंडसाठी रवाना होईल. 23 जानेवारीपासून न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात होईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वेळापत्रक
वन डे मालिका
23 जानेवारी – पहिला वन डे सामना
26 जानेवारी – दुसरा वन डे सामना
28 जानेवारी – तिसरा वन डे सामना
31 जेनवारी – चौथा वन डे सामना
3 फेब्रुवारी – पाचवा वन डे सामना
टी-20 मालिका
6 फेब्रुवारी – पहिला टी ट्वेण्टी सामना
8 फेब्रुवारी – दुसरा टी ट्वेण्टी सामना
10 फेब्रुवारी – तिसरा टी ट्वेण्टी सामना