Australia vs India, 1st Test | मोहम्मद शमी दुखापतग्रस्त, दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार?

| Updated on: Dec 19, 2020 | 5:56 PM

पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विराट सेनेचा 8 विकेट्सने पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

Australia vs India, 1st Test | मोहम्मद शमी दुखापतग्रस्त, दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार?
Follow us on

अ‌ॅडिलेड : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर पहिल्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने मात (Australia vs India 1st Test) केली. हा पहिला सामना तिसऱ्याच दिवशी निकाली निघाला. टीम इंडियाने दुसऱ्या डावात अवघ्या 36 धावा केल्याने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 धावांचे माफक आव्हान मिळाले. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दरम्यान या पराभवासह टीम इंडियासाठी आणखी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीमुळे शमीला दुसऱ्या डावात गोलंदाजीही करता आली नाही. यामुळे टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा आहे. Australia vs India 1st Test Bowler Mohammed Shami injured likely to miss Test series against Australia

नक्की काय झालं?

दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजांनी ढिसाळ कामगिरी केली. फलंदाजांनी एकामागोमाग एक विकेट गमावले. मोहम्मद शमी फंलदाजीसाठी मैदानात आला. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर शमीला ही दुखापत झाली. कमिन्सने टाकलेला चेंडू शमीच्या उजव्या हाताच्या बोटाला लागला. त्यामुळे शामीला दुखापत झाली. शमीला या दुखापतीचा त्रास जाणवल्याने त्याला रिटायर्ड हर्ट घोषित करण्यात आलं. परिणामी टीम इंडियाचा दुसरा डाव 36-9 वर घोषित करावा लागला. या दुखापतीमुळे शमीला दुसऱ्या डावात गोलंदाजीही करता आली नाही. यावरुन शमीला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याची चर्चा आहे.

शमीच्या दुखापतीबाबत विराटची प्रतिक्रिया

“शमीच्या बाबतीत मला काहीच माहिती नाही. शमीची लवकरच आवश्यक ती चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचा अहवाल संध्याकाळपर्यंत मिळेल”, अशी माहिती कर्णधार विराट कोहलीने दिली. दरम्यान आता शमीच्या त्या रिपोर्टची सर्वांना प्रतिक्षा आहे.

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. ही मॅच बॉक्सिंग डे क्रिकेट मॅच असणार आहे. त्यामुळे जर दुर्देवाने शमीला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं, तर हा टीम इंडियासाठी मोठा धक्का असेल.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 1st Test | टीम इंडिया 36 धावात गारद कशी होऊ शकते? लाजिरवाण्या पराभवाची 5 कारणे

Australia vs India 1st Test | टीम इंडियाच्या पराभवाचे टॉप 3 व्हिलन

Australia vs India 1st Test Bowler Mohammed Shami injured likely to miss Test series against Australia