Prithvi Shaw | पृथ्वी शॉ झिरोवर बोल्ड, चाहत्यांनी सोशल मीडियावर झोडपलं
मिचेल स्टार्कने पृथ्वी शॉला शून्यावर आऊट केलं.
अॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडिलेड ओव्हलमध्ये पहिला डे-नाईट कसोटी सामना (Australia vs India 1st Test) खेळण्यात येत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ही सलामी जोडी मैदानात आली. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी क्लिन बोल्ड झाला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वीला शून्यावर बोल्ड केलं. पृथ्वीला भोपळाही फोडता आला नाही. पृथ्वी आयपीएलपासून सातत्याने निराशाजनक कामगिरी करतोय. पृथ्वी या पहिल्या कसोटीत शून्यावर बाद झाल्याने त्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे. पृथ्वीच्या या ढिसाळ कामगिरीमुळे तो ट्विटरवर ट्रेंडही होतोय. Australia vs India 1st Test Prithvi Shaw Trolled On Twitter After Dismmised duck
"If he does have a chink in his armour it's the ball which does come back into him…
"Quite often leaves a big gap between bat and pad and that's where the Aussies will target." @RickyPonting at his peerless best for the Prithvi Shaw wicket #AUSvIND pic.twitter.com/4nh67zBcpU
— 7Cricket (@7Cricket) December 17, 2020
पाहुयात भन्नाट मीम्स
I won't blame #PrithviShaw for his duck..
Delhi coach dropped out of form Prithvi but our gr8 legendary tharki coach Ravi Shastri will be like ??? pic.twitter.com/lYZwcUvFHC
— Vaibhav (@vabby_16) December 17, 2020
#PrithviShaw Gets Out On A Duck.
Memers Who Trolling Him Since Yesterday : pic.twitter.com/FpFHHcGv1U
— HarAnuragBasuNahiHota (@Anu_rag_Singh_) December 17, 2020
Bcci to Prithvi show = pic.twitter.com/cUope5zSRl
— Ram Meena (@RamMeenaHindu) December 17, 2020
#PrithviShaw after getting out:#INDvsAUS 1st test pic.twitter.com/gLtFilq3O3
— HiFiRishi (@hifi_rishi) December 17, 2020
#PrithviShawFixed It ?? pic.twitter.com/ZfoQeCX7LK
— HarAnuragBasuNahiHota (@Anu_rag_Singh_) December 17, 2020
ढिसाळ कामगिरी, तरीही संधी
पृथ्वी शॉ याला गेल्या काही काळापासून आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पृथ्वीने दमदार शतक ठोकत टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र पृथ्वी सातत्यपूर्ण कामगिरी करण्यास अपयशी ठरत आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेआधी 2 सराव सामने खेळण्यात आले. या सराव सामन्यातही पृथ्वीने निराशा केली. या सराव सामन्यात 40 ही पृथ्वीची सर्वोच्च धावसंख्या होती. पहिल्या कसोटीसाठी शुभमन गिलला संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र ऐन वेळेस टीम मॅनेजमेंटने गिलला वगळून पृथ्वीला संधी दिली. यामुळे गिल समर्थकांकडूनही पृथ्वीवर टीका करण्यात येत आहे.
आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी
पृथ्वीला आयपीएलच्या 13 व्या मोसमात विशेष कामगिरी करता आली नाही. पृथ्वीने या 13 व्या मोसमात एकूण 9 सामन्यात 228 धावा केल्या.
संबंधित बातम्या :
Australia vs India, 1st Test | विराटचं टॉस जिंकणं टीम इंडियासाठी विजयाचे संकेत, पाहा आकडेवारी
Australia vs India, 1st Test, Day 1 : कर्णधार विराट कोहलीचे 123 चेंडूत झुंजार अर्धशतक
IND vs AUS | अनेक खेळाडू ऑऊट ऑफ फॉर्म, तरीही निवड, कोहलीचा निर्णय महागात पडणार?
Australia vs India 1st Test Prithvi Shaw Trolled On Twitter After Dismmised duck