Australia vs India 1st Test | टीम इंडियाच्या पराभवाचे टॉप 3 व्हिलन

ऑस्ट्रेलियाने या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

Australia vs India 1st Test | टीम इंडियाच्या पराभवाचे टॉप 3 व्हिलन
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 3:31 PM

अ‌ॅडिलेड : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पहिल्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने पराभव केला. या विजयासह कांगारुंनी 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने विराटसेनेचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांवर गुंडाळला. भारताकडे पहिल्या डावात 53 धावांची आघाडी त्यामुळे कांगारुंना विजयासाठी 90 धावांचे आव्हान मिळाले. हे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पराभवामुळे टीम इंडिया पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलिया कर्णधार टीम पेन, वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे टीम इंडियाच्या पराभवाचे व्हिलन ठरले. Australia vs India 1st Test Top 3 villains of Team India defeat

टीम पेनची नाबाद अर्धशतकी खेळी

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना पहिल्या डावात ठराविक अंतराने धक्के दिले. यामुळे ऑस्ट्रेलिया अडचणीत सापडली होती. मात्र ऐनवेळेस कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पेनने ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या. पेनने नाबाद 73 धावा केल्या. यामध्ये त्याने 10 चौकार लगावले. पेनच्या या झुंजार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 191 धावांपर्यंत मजल मारता आली.

पॅट कमिन्सचा अचूक मारा

टीम इंडियाच्या फलंदाजांना पॅट कमिन्सचा सामना करता आला नाही. पॅटने या सामन्यात दमदार गोलंदाजी केली. पॅटने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या. पॅटने पहिल्या डावात सलामीवीर मयंक अग्रवाल, रवीचंद्रन आश्विन आणि मोहम्मद शमीला बाद केलं. तर दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली यांना आऊट केलं. पॅटने ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.

जोश हेझलवूडची फाईव्ह स्टार कामगिरी

जोश हेझलवूडने या सामन्यात एकूण 6 विकेट्स घेतल्या. हेझलवूडने पहिल्या डावात 1 तर दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाला 36 धावांवर गुंडाळण्यात जोशने निर्णायक भूमिका बजावली. जोशने टीम इंडियाच्या फंलदाजांना सेट होण्याची वेळच दिली नाही.

जोशने दुसऱ्या डावात मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धीमान साहा आणि आर आश्विनला बाद केलं. जोशच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाचा पहिला डाव 36 धावांवर आटोपला. परिणामी ऑस्ट्रेलियाला 90 धावांचे आव्हान मिळाले. यामुळे ऑस्ट्रेलियाचा सहज विजय झाला.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 1st Test | टीम इंडिया 36 धावात गारद कशी होऊ शकते? लाजिरवाण्या पराभवाची 5 कारणे

Australia vs India 1st Test Top 3 villains of Team India defeat

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.