Australia vs India, 1st Test | सोशल मीडियावर व्हायरल होणारा 9420408404 हा नंबर नक्की काय आहे? जाणून घ्या

सोशल मीडियावर हा नंबर व्हायरल होत आहे.

Australia vs India, 1st Test | सोशल मीडियावर व्हायरल होणारा  9420408404 हा नंबर नक्की काय आहे? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 11:54 AM

अ‌ॅडिलेड : सोशल मीडियावर कालपासून 9420408404 हा मोबाईल नंबर व्हायरल होतोय. हा मोबाईल नंबर कोणाचा आहे, सोशल मीडियावर अचानक का व्हायरल करण्यात आला, असा प्रश्न अनेक नेटीझन्सना पडला आहे. तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचं निरसण आम्ही करणार आहोत. व्हायरल होत असलेला हा मोबाईल नंबर कोणाचा आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. Australia vs India 1st Test  Whose number is 9420408404 that goes viral on social media

दहा नंबरी आकडा चेष्टा मस्करी म्हणून किंवा कोणाची फिरकी घेण्यासाठी व्हायरल करण्यात आलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे व्हायरल होणारा आकडा मोबाईल नंबर म्हणून व्हायरल होत असला, तरी मुळात या दहा आकड्यांची निर्मिती ही टीम इंडियाच्या फलंदाजांनी केली आहे. होय हे खरं आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव केला. दुसऱ्या डावात टीम इंडियाची 9 बाद 36 अशी स्थिती झाली. टीम इंडियाच्या निच्चांकी धावसंख्येमुळे ट्विटरवर #36AllOut हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

या दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात मयंक अग्रवालने सर्वाधिक 9 धावा केल्या. यामुळे प्रत्येकी फंलदाजाची आकडेवारी ही एकेरी होती. त्यामुळे सोशल मीडियावर टीम इंडियावर उपरोधिक टीकेच्या हेतूने 9420408404 हा आकडा मोबाईल नंबर व्हायरल करण्यात आला.

खेळाडूनिहाय धावा

मयंक अग्रवाल -9, पृथ्वी शॉ-4, जसप्रीत बुमराह-2, चेतेश्वर पुजारा-0, विराट कोहली-4, अजिंक्य रहाणे-0, हनुमा विहारी-8, रिद्धीमान साहा-4, रवीचंद्रन आश्विन-0 आणि उमेश यादव-4*

ट्रू कॉलर काय सांगतंय?

हा व्हायरल होणारा नंबर कोणाचा आहे, हे जाणून घेण्याच्या उत्सुकेतेपोटी अनेकांनी हा नंबर ट्रू कॉलरवर सर्च केला. त्यामुळे ट्रू कॉलरवर हा नंबर सर्च केल्यास india worst score in cricket असं दिसून येत आहे.

1955 नंतर कसोटीतील सर्वात निच्चांकी धावसंख्या

टीम इंडियाने दुसऱ्या डावात 36 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाच्या नावे लाजीरवाणा विक्रम झाला. टीम इंडियाने तब्बल 65 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये निच्चांकी धावसंख्या नोंदवली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात निच्चांकी धावसंख्या न्यूझीलंडने केली आहे. 1955 मध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला अवघ्या 26 धावांवर ऑल आऊट केलं.

टीम इंडियाच्या नावावर नकोसा विक्रम

या निच्चांकी धावसंख्येमुळे टीम इंडियाच्या नावावर कसोटी इतिहासातील नकोसा विक्रम झाला आहे. आतापर्यंत कसोटी सामन्यात अनेकदा निच्चांकी धावसंख्या नोंदवण्यात आली. मात्र त्या संबंधित संघातील किमान एका फलंदाजाने तरी दुहेरी आकडा गाठला. मात्र टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. असं घडण्याची ही कसोटी इतिहासातील पहिलीच वेळ ठरली. परिणामी हा नकोसा विक्रम टीम इंडियाच्या नावे झाले.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 1st Test | कसोटी इतिहासात टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

Australia vs India 1st Test | टीम इंडियाच्या पराभवाचे टॉप 3 व्हिलन

Australia vs India 1st Test  Whose number is 9420408404 that goes viral on social media

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.