AUSvsIND : भारतासमोर विजयासाठी तब्बल 299 धावांचं आव्हान

Adelaide Oval, Adelaide : ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलंय. शॉन मार्शची शतकी (131) खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज 48 धावा यामुळे ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली. पण शेवटच्या शतकांमध्ये मॅक्सवेल आणि मार्शला बाद केल्यामुळे भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला वेळेतच वेसन घातली. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत हा सामना जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे. कारण, पहिला सामना […]

AUSvsIND : भारतासमोर विजयासाठी तब्बल 299 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

Adelaide Oval, Adelaide : ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलंय. शॉन मार्शची शतकी (131) खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज 48 धावा यामुळे ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली. पण शेवटच्या शतकांमध्ये मॅक्सवेल आणि मार्शला बाद केल्यामुळे भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला वेळेतच वेसन घातली.

तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत हा सामना जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे. कारण, पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतलं आव्हान कायम राखण्यासाठी भारताला ही महत्त्वाची लढत आहे. पण ऑस्ट्रेलियाने मोठं आव्हान दिल्यामुळे सर्व मदार आता भारतीय फलंदाजांवर असेल.

भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचला केवळ सहा धावांवर चालतं केलं. त्यानंतर मोहम्मद शमीने अॅलेक्स केरीला 18 धावांवर बाद केलं. पण शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजाने चांगली भागीदारी केली. ही भागीदारी ख्वाजाला धावबाद करुन जाडेजाने मोडित काढली. शॉन मार्शला पीटर हँड्सकॉम्ब आणि मार्कस स्टॉईनिसने छान साथ दिली. त्यानंतर मॅक्सवेलने आक्रमक खेळी करत 48 धावा केल्या.

भारताकडून भुवनेश्वर कुमारने 45 धावा देऊन 4, मोहम्मद शमीने 58 धावांच्या बदल्यात 3, तर रवींद्र जाडेजाने एक विकेट घेतली. कुलदीप यादव आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण करत असेलल्या मोहम्मद सिराजला एकही विकेट मिळाली नाही. मोहम्मद सिराजने 10 षटकात सर्वाधिक 76, तर कुलदीपने 66 धावा दिल्या.

सिडनीच्या सामन्यात 289 धावांचं आव्हान होऊनही भारताला पराभव पत्करावा लागला होता. कारण, सलामीवीर शिखर धवन, विराट कोहली आणि अंबाती रायुडू स्वस्तात माघारी परतले होते. यावेळी सर्व फलंदाजांना एकत्रित कामगिरी करावी लागेल तेव्हाच हा सामना जिंकता येईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.