Shardul Thakur | दबावात कसं खेळायचं हे धोनीकडून शिकलो : शार्दुल ठाकूर

शार्दुलने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू कामिगरी केली.

Shardul Thakur | दबावात कसं खेळायचं हे धोनीकडून शिकलो : शार्दुल ठाकूर
'पालघर एक्सप्रेस' शार्दुल ठाकूर
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 5:44 PM

मुंबई : “दबावात्मक परिस्थितीत कसं खेळायचं हे मी धोनीकडून शिकलो. दबावात कसा खेळ करायचा या  विषयावर मी धोनीसोबत (Mahendra Singh Dhoni) अधिक वेळ चर्चा करायचो. धोनीने एक खेळाडू, कर्णधार आणि पराभूत संघाचा सदस्य म्हणून दबावात्मक परिस्थीतीचा सामना केला आहे. विजयानंतर धोनीला क्रिकेट चाहत्यांकडून मिळणारं प्रेमही मी अनुभवलं आहे. धोनीकडे फार अनुभव आहे, अशा शब्दात शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) टीम इंडियाचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कुल’ महेंद्रसिंह धोनीचं कौतुक केलं आहे. शार्दुलने टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. यावेळेस तो बोलत होता. (australia vs india shardul thakur praises mahendra singh dhoni)

“धोनी ज्ञानाचा महासागर”

“आमच्या सारख्या नवख्या खेळाडूंना धोनीकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. धोनी आम्हाला त्याचा अनुभव सांगतो. तेव्हा आम्ही फक्त ऐकतो. धोनी दररोज काही न काही नवीन करत असतो. जर तुम्ही हुशार असाल तर धोनीच्या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकता येईल. धोनीकडून दररोज नवीन काही शिकायला मिळतं”, असं शार्दुल म्हणाला.

ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया भारतात परतली. यानंतर मुंबईकर खेळाडूंचं एअरपोर्टवर स्वागत करण्यात आलं. यानंतर शार्दुलचं पालघरमधील राहत्या घरी पोहचला. या ठिकाणी शार्दुलचं जंगी स्वागत केलं गेलं. शार्दुलच्या आईने त्याचं औक्षण केलं. शार्दुलला पाहण्यासाठी माहिममधील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. यावेळेस शार्दुलने आपल्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांसह केक कापून ऑस्ट्रेलियाविरोधातील विजयाचं सेलिब्रेशन केलं.

चौथ्या सामन्यात निर्णायक कामगिरी

रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्याने शार्दुलला चौथ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. शार्दुलने या संधीचं सोनं केलं. शार्दुलने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटीत बॅटिंग आणि बोलिंगने निर्णायक भूमिका बजावली. त्याने वॉशिंग्टंन सुंदरसह पहिल्या डावात 7 व्या विकेटसाठी 123 धावांची निर्णायक भागीदारी केली. शार्दुलने पहिल्या डावात 67 धावांची खेळी केली. तर एकूण 2 डावांमध्ये 7 विकेट्स घेतल्या.

संबंधित बातम्या :

Shardul Thakur | ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरचे माहिम गावात जंगी स्वागत,आईकडून औक्षण

Shardul Thakur | आधी मुंबई लोकलमधून पालघरला परतला, आता शार्दूल ठाकूर मुंबई विमानतळावरुन कुठे गेला?

Suresh Raina | ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचा कमाईबाबत विक्रम, मानाच्या पंगतीत स्थान

Mahendra Singh Dhoni | आयपीएलची कमाल, ‘कॅप्टन कुल’ मालामाल, धोनीची छप्परफाड कमाई

(australia vs india shardul thakur praises mahendra singh dhoni)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.