तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूची निवृत्ती! ‘त्या’ वक्तव्याने बसला आश्चर्याचा धक्का

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारतानं 2-0 ने आघाडी घेतली आहे. इंदौरमध्ये तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचं निवृत्तीबाबत वक्तव्य समोर आलं आहे.

तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूची निवृत्ती! 'त्या' वक्तव्याने बसला आश्चर्याचा धक्का
तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूची निवृत्तीची घोषणा!नेमकं काय झालं वाचाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 7:40 PM

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघात बॉर्डर गावसकर कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतानं 2-0 ने आघाडी घेतली आहे. इंदौरमध्ये तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडू डेविड वॉर्नर याने निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आपण कधीपर्यंत खेळायचं हे आपली आवड सांगत असते. पण काही जणांच्या मते मी माझी शेवटची कसोटी खेळलो आहे. सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरनं आपल्या कसोटी करिअरबाबत वक्तव्य केलं आहे. “निवड समितीने कसोटी करिअर संपवण्याचा निर्णय घेतला असेल. तर 2024 पर्यंत मी मर्यादीत षटकांचा सामना खेळू इच्छित आहे.”, असंही त्याने पुढे सांगितलं. काही क्रीडा जाणकारांच्या मते, वॉर्नरनं आपला शेवटचा कसोटी सामना दिल्लीत खेळला. दुसरीकडे वॉर्नरनं स्वत:च सांगितलं की, निवड समिती त्याला कसोटीत खेळवू इच्छित नाही.त्यामुळे आता त्याच्या निवृत्तीची चर्चा होत आहे.

कोपराच्या दुखापतीमुळे डेविड वॉर्नर बॉर्डर गावसकर मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात खेळणार नाही. दुखापतीनंतर वॉर्नर मायदेशी परतला आहे. वॉर्नरने भारताविरुद्ध खेळलेल्या तीन डावात 1,10 आणि 15 धावा केल्या आहेत. दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत डोक्याला जबर मार लागल्याने फलंदाजी करू शकला नव्हता.

डावखुऱ्या डेविड वॉर्नरला अॅशेज दौऱ्यात खेळण्यास संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. “मी कायम एकच गोष्ट सांगितली आहे, मी 2024 पर्यंत खेळू इच्छित आहे. पण निवड समितीली मी कसोटीत खेळणं योग्य वाटत नसेल तर मी काहीच करू शकत नाही. मी व्हाईट चेंडूने खेळण्याचा प्रयत्न करेन.”

“माझ्याकडे अजूनही 12 महिने आहेत. या महिन्यात मला खूप क्रिकेट खेळायचं आहे. मला धावा करायच्या आहेत. मी टीमला सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करेन. पण जेव्हा तुम्ही 36 वर्षांचे किंवा 37 वर्षांचे होता तेव्हा टीकाकारांच्या रडारवर येता. माजी खेळाडूंच्या बाबतीतही असंच झालं आहे.”, असंही त्याने पुढे सांगितलं.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.