Dean Jones | IPL कॉमेंट्रीसाठी मुंबईत, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे मुंबईत ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आयपीएलच 2020 चे समालोचन करण्यासाठी ते मुंबईत आले होते. (Former Australian cricketer Dean Jones died in Mumbai )

Dean Jones | IPL कॉमेंट्रीसाठी मुंबईत, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 5:23 PM

मुंबई- ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स (Dean Jones) यांचे मुंबईत ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. जोन्स यांनी 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आयपीएल 2020(IPL2020) चे समालोचन करण्यासाठी जोन्स मुंबईत आले होते. (Former Australian cricketer Dean Jones died in Mumbai )

आयपीएल 2020 चे समालोचन करण्यासाठी मुंबईत आलेले डीन जोन्स एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. आज सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना हरकिसनदास रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी जोन्स यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

डीन जोन्स यांनी 1984 ते 1992 या दरम्यान कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले. 8 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 52 कसोटी सामने खेळले. जोन्स यांनी 46.55 च्या सरासरीने 3631 धावा केल्या. कसोटी सामन्यात 11 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली. 216 ही जोन्स यांची कसोटीमधील सर्वाधिक धावसंख्या होती.

एकदिवसीय सामन्यात डीन जोन्स यांनी 164 सामन्यांमध्ये 44.61 च्या सरासरीने 6068 धावा केल्या. यामध्ये 7 शतके आणि 46 अर्धशतकांचा समावशे होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून क्रिकेट खेळल्यानंतर जोन्स यांनी प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून काम केले होते.

डीन जोन्स यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohali) ट्विटरवरुन जोन्स यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला असल्याचे म्हटले.

संबंधित बातम्या-

विराट तुमचा टाईम मॅनेजमेंट चांगला, तुम्ही थकत नाही का? पंतप्रधानांच्या प्रश्नावर विराट म्हणतो…

IPL 2020 : सनरायजर्स हैदराबादला मोठा धक्का, दुखापतीमुळे मिचेल मार्श स्पर्धेबाहेर

(Former Australian cricketer Dean Jones died in Mumbai )

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.