ऑस्ट्रेलियाने (Australia) T20 विश्वचषकासाठी जर्सी (jursi) लाँच केली आहे. नव्या जर्सीत खेळाडू एकदम उठून दिसत आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ स्वदेशी थीम असलेली जर्सी घालून मैदानात उतरतील. यावेळी दिनेश कार्तिकला (dinesh kartik) ऑस्ट्रेलिया संघाची जर्सी अधिक आवडली आहे. त्यामुळे त्याने एक ट्विट केलं आहे. त्यामुळे पुन्हा सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु झाली आहे.
त्याने ऑस्ट्रेलिया टीमला उपरोधिक टोला लगावला आहे, की त्यांनी फक्त RCB मधूनच नाही. तर इतर फ्रँचायझींमधून संघ निवडण्याची गरज आहे, असा आशय दिनेश कार्तिकने लिहिल्यापासून सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.
भारतात आयपीएलमध्ये जगभरातील अनेक खेळाडूंनी आपली चांगली कामगिरी दाखवली आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आत्तापर्यंत चांगली खेळी केली असल्यामुळे त्यांना आयपीएल संघात अधिक मागणी असते.
ऑस्ट्रेलियाकडून जर्सी घातलेल्या तीन खेळाडूंचे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि हेजलवुड हे खेळाडू आहेत. हे तिन्ही खेळाडू आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतात. त्यामुळे दिनेश कार्तिकने असं ट्विट केलं आहे.