AUSvsIND : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे 175 धावांची आघाडी
पर्थ : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पर्थ कसोटीत 175 धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चार बाद 132 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव 283 धावांवरच गुंडाळल्यामुळे यजमान संघाला 43 धावांची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावासाठी मैदानात उतरल्यामुळे तडकाफडकी सुरुवात केली. पण अरॉन फिंच दुखापतीमुळे 20 धावांवर असतानाच माघारी […]
पर्थ : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पर्थ कसोटीत 175 धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चार बाद 132 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव 283 धावांवरच गुंडाळल्यामुळे यजमान संघाला 43 धावांची आघाडी मिळाली होती.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावासाठी मैदानात उतरल्यामुळे तडकाफडकी सुरुवात केली. पण अरॉन फिंच दुखापतीमुळे 20 धावांवर असतानाच माघारी परतला. पण उस्मान ख्वाजाने 41 धावांची खेळी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाची आघाडी वाढली. यामध्ये मार्कस हॅरिस (20), फिंच (25), पीटर हँड्सकॉम्ब (13), ट्रॅविस हेड (19) यांनीही योगदान दिलं. सध्या टीम पेन (8) आणि उस्मान ख्वाजा (41) खेळपट्टीवर आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी एक, तर मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या. भारताला हा सामना जिंकायचा असेल तर ऑस्ट्रेलियाचा डाव लवकरात लवकर गुंडाळणं आवश्यक आहे. त्यामुळे भारताच्या विजयाची मदार आता गोलंदाजांच्या खांद्यावर आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पर्थ कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने शतकी खेळी (123) करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडित काढला आहे. कोहलीच्या कारकीर्दीतील हे 25 वं शतक होतं. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वात जलदगतीने 25 वं कसोटी शकत झळकावणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. 127 इनिंगमध्येच कोहलीने 25 वं शतक पूर्ण केलं.
25 शतकांचा पल्ला गाठण्यासाठी सर डॉन ब्रॅडमन यांनी फक्त 68 इनिंग खेळल्या, विराटने 127, तर सचिनने 130 इनिंगमध्ये 25 शतकं पूर्ण केले होते. बॅडमन यांनी 70 वर्षांपूर्वी केवळ 68 डावांमध्ये 25 वे कसोटी शतक पूर्ण करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. तर विराटने 127 डावांमध्ये ही कामगिरी पार पाडली.