Mohammad Amir : मोहम्मद आमिरचा अप्रतिम चेंडू, आधी उडवली स्टंप, नंतर…
अचानक आलेला चेंडू पाहून विकेट किपर सुद्धा घाबरला.
पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमिरचा (Mohammad Amir) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी त्यावर अनेक कमेंट केल्या आहेत. या आगोदर मोहम्मद आमिरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण नुकताचं व्हायरल झालेल्या व्हिडीओची अधिक चर्चा आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) जलदगती गोलंदाज पहिल्यापासून अधिक चर्चेत आहे.
सेंट लुसिया किंग्जचा फलंदाज जॉन्सन चार्ल्स हा खेळत असताना पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमिर गोलंदाजी करीत आहे. त्यावेळी मोहम्मद अमीरचा चेंडू अचानक उसळला आणि जॉन्सन चार्ल्सचा क्लिन बोल्ड झाला. परंतु चेंडू तेवढ्यावर न थांबता थेट विकेट किपरकडे गेला.
Amir gets the breakthrough!!! Mohammad Amir bowls a sensational delivery to remove Charles as this evenings @fun88eng Magic Moment!! #CPL22 #SLKvJT #CricketPlayedLouder #Fun88 #BiggestPartyInSport pic.twitter.com/vSPux9DYMI
— CPL T20 (@CPL) September 28, 2022
अचानक आलेला चेंडू पाहून विकेट किपर सुद्धा घाबरला. तो थेट खाली बसला त्यामुळे चेंडू त्याच्या डोक्यावरुन गेला. तो खाली बसला नसता तर चेंडू त्याला लागला असता.
आत्तापर्यंत बेसावध असलेल्या अनेक खेळाडूंना चेंडू लागला आहे.