Axar Patel | ना जलेबी, ना फाफडा, अक्षर पटेल आपडा, लोकल बॉय अक्षरला 11 विकेट
Ind vs Eng : लोकल बॉय अक्षर पटेलने (Axar Patel) या कसोटीत धमाका केला. पहिल्या डावात 6 विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेलने दुसऱ्या डावातही टिच्चून गोलंदाजी केली.
अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत (IND vs ENG Test Series) विकेट्सचा महापूर पाहायला मिळाला. दिवसभरात भारताचे 7 आणि इंग्लंडचे 10 असे मिळून 17 विकेट्स पडल्या. लोकल बॉय अक्षर पटेलने (Axar Patel) या कसोटीत धमाका केला. पहिल्या डावात 6 विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेलने दुसऱ्या डावातही टिच्चून गोलंदाजी केली. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 81 डावात गुंडाळला. यामध्ये अक्षर पटेलने तब्बल 5 विकेट्स घेतल्या. म्हणजेच अक्षर पटेलने या तिसऱ्या कसोटीत तब्बल 11 विकेट्सचा भडिमार केला. या विकेट्ससह अक्षर पटेलने विक्रमांचा रतीब घातला. (Axar Patel and R Ashwin run through England’s line-up to set India a target of 49 to win india vs england 3rd test)
पहिल्याच षटकात कमाल
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात अक्षर पटेलने (Axar Patel) पहिल्या ओव्हरपासूनच वात पेटवली. पहिल्या ओव्हच्या पहिल्याच चेंडूवर जॅक क्राउलीला (Zak Crawley) क्लीन बोल्ड करुन धमाका केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट घेणारा अक्षर पटेल हा चौथा गोलंदाज ठरला आहे.
दुसऱ्या डावात 5 विकेट्स
अक्षर पटेलने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात तुफानी गोलंदाजी केली. एकीकडे अक्षर पटेल इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर उभं राहू देत नव्हता, तर दुसरीकडे आर अश्विन आपल्या फिरकीवर फलंदाजांना नाचवत होता. अक्षर पटेलने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला. त्याने तब्बल 5 विकेट्स घेतल्या. सलामीवीर क्राऊली, सिब्ली, जॉनी बेअर्स्ट्रो (Jonny Bairstow ), कर्णधार ज्यो रुट (Joe Root) आणि बेन फोक्स या महत्त्वाच्या विकेट्स अक्षर पटेलने घेतल्या.
आर अश्विनचीही कमाल
टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (Ravichandran Ashwin) शांत कसा राहील? अश्विननेही आपल्या फिरकीवर इंग्लंडच्या फलंदाजांची भांबेरी उडवली. अश्विने अहमदाबाद कसोटीत पहिल्या डावात 3, तर दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या.
भारताला विजयासाठी अवघ्या 49 धावांचे आव्हान
टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या डावात 81 धावांवर रोखले. यामुळे भारताला विजयासाठी 49 धावांचे आव्हान मिळाले आहे.
(Axar Patel and R Ashwin run through England’s line-up to set India a target of 49 to win india vs england 3rd test)
संबंधित बातम्या