Ab de villiers : केवळ 57 चेंडूत 162 धावा पाहून ‘एबी डिव्हिलियर्स’ झाला खूश, पाहा व्हिडीओ
CSA टी-20 चॅलेंजमध्ये, Dewald Brevis याने 35 चेंडूत शतक झळकावलं
नवी दिल्ली : ‘BABY AB‘या नावाने एक क्रिकेटर त्याच्या चांगल्या खेळीमुळे अधिक प्रसिद्ध आहे. त्याने आतापर्यंत अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. कमी चेंडूत अधिक धावा काढण्यासाठी तो अधिक प्रसिद्ध आहे. डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) असं त्याचं खरं नावं आहे. त्याने कालच्या मॅचमध्ये (T20 Cricket) अशी खेळी केली की, त्याचं एबी डिविलियर्स कौतुक करावं लागलं. एबी डिविलियर्स (Ab de villiers) काल एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये ब्रेविस याचं नावं लिहिलं आहे. त्यापुढं अधिक काही सांगण्याची गरज नाही असं म्हटलं आहे.
Dewald Brevis. No need to say more
हे सुद्धा वाचा— AB de Villiers (@ABdeVilliers17) October 31, 2022
CSA टी-20 चॅलेंजमध्ये, Dewald Brevis याने 35 चेंडूत शतक झळकावलं, त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून क्रिकेटचे चाहते सुद्धा त्याचे कौतुक करीत आहेत.
Dewald Brevis 35 balls hundred.#CSAT20Challenge#DewaldBrevispic.twitter.com/gAlXLu7lFh
— Cricket Videos? (@Crickket__Video) October 31, 2022
टाइटन्स नाइट्स यांच्या विरुद्ध काल Dewald Brevis याने गोलंदाजांची मैदानात धुलाई केली. कालचा हा सामना प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय असणार आहे. डेवाल्ड ब्रेविसने कालच्या मॅचमध्ये 57 चेंडूत 162 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 13 षटकार, 13 चौकार लगावले.
T20 क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी
ख्रिस गेल – नाबाद 175 (66 चेंडू), २०१३ आरोन फिंच – 172 (76 चेंडू), 2018 एच. मसाकादझा – नाबाद 162 (61 चेंडू), 2016 एच. जझाई – नाबाद 162 (62 चेंडू), 2019 डेवाल्ड ब्रेविस – 162 (57 चेंडू), 2022