IND vs ENG: भारत आणि इंग्लंड मॅचच्या काही तास आधी वाईट बातमी, हा बॉलर जखमी झाल्याने टीम बाहेर
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आज मॅच सुरु होण्याआगोदर एक वाईट बातमी बाहेर आली आहे
एडिलेड : आज टीम इंडिया (IND) आणि इंग्लंड (ENG) यांच्यात सेमीफायनलची दुसरी मॅच होणार आहे. आजच्या मॅचमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातला संघर्ष एडिलेडच्या मैदानात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आज दुपारी दीड वाजता सुरु होणाऱ्या मॅचकडे सगळ्या क्रिकेट चाहत्यांचं (Cricket Fan) लक्ष लागलं आहे. काल सेमीफायनलच्या पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तान टीमने न्यूझिलंड टीमचा पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तान टीम फायनलमध्ये पोहोचली आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आज मॅच सुरु होण्याआगोदर एक वाईट बातमी बाहेर आली आहे. महत्त्वाचा गोलंदाज जखमी झाला आहे. इंग्लंड टीमचा महत्त्वाचा गोलंदाज मार्क वुड जखमी झाला आहे. त्याने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत चार मॅचमध्ये नऊ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 154.74kph च्या स्पीडने मार्क वुडने गोलंदाजी केली आहे. आजच्या मॅच मार्क वुड नाही खेळला तर इंग्लंडच्या टीमला मोठा धक्का असेल.
Mark Wood is set to miss the #T20WorldCup semi-final with muscle stiffness, with Chris Jordan likely to take his place in England’s XI
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 9, 2022
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार इंग्लंड टीम मार्क वुड यांच्या जागेवर दुसरा खेळाडू खेळवण्याच्या तयारीत आहे. क्रिस जॉर्डन या खेळाडूला आजच्या सामन्यात संधी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या खेळाडूने अद्याप एकही विश्वचषक स्पर्धेतील खेळलेला नाही.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
इंग्लंड टीम
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
रेकॉर्ड
- 22 वेळा मॅच झाली
- टीम इंडिया 12 वेळा जिंकली
- इंग्लंड टीम 10 वेळा जिंकली
- T20 विश्वचषकात 3 वेळा आमनेसामने
- भारत 2 वेळा जिंकला
- इंग्लंड टीम 1 जिंकली
- 2007 – भारत 18 धावांनी जिंकला
- 2009 – इंग्लंड 3 धावांनी विजयी
- 2012 – भारत 90 धावांनी विजयी