NZ vs BAN : बांगलादेशला झटका, कर्णधार तमीम इक्बालचा सिरीज न खेळण्याचा निर्णय, कारण काय?
बांगलादेश संघाचा कर्णधार तमीम इक्बालने (tamim iqbal) न्यूझीलंडविरुद्धच्या (Bangladesh vs New Zealand) आगामी टी ट्वेन्टी सिरीज न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध वन डे सिरीज खेळण्यासाठी सज्ज झालेल्या बांगलादेश (Bangladesh vs New Zealand) टीमला मोठा झटका बसला आहे. बांगलादेश संघाचा कर्णधार तमीम इक्बालने (tamim iqbal) आगामी टी ट्वेन्टी सिरीज न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वैयक्तिक करणांमुळे ही सिरीज न खेळण्याचा तमीमने निर्णय घेतल्याची माहिती आहे.
तमीम इक्बाल आधीच दुखापतीमुळे परेशान आहे. अशात न्यूझीलंडविरुद्ध होणारी एकदिवसीय मालिका देखील तो खेळेल की नाही, याची शाश्वती नाहीय. परंतु मायदेशी परतण्याअगोदर काही मॅच खेळेन, असा निर्धार तमीमने बोलून दाखवला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (Bangladesh vs New Zealand) यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 20 मार्च पासून सुरुवात होत आहे. ही एकदिवसीय मालिका पार पडल्यानंतर 3 टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका उभयतांमध्ये खेळवली जाणार आहे.
एकदिवसीय मालिका खेळण्याचा निर्धार
तमीमने गुरुवारी एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या निर्णयाविषयी बोलताना एकदिवसीय मालिका खेळण्याचा निर्धार व्यक्त केला. तमीम म्हणाला, माझं टीम मॅनेंजमेंट आणि मुख्य प्रशिक्षकांशी बोलणं झालंय. बांगलादेश संघाला जिंकण्यासाठी माझ्या शुभेच्छा.. पहिल्या मॅचमध्ये मी खेळेन, अशी मला आशा आहे. हैमस्ट्रिंगच्या दुखापतीतून मी आता सावरत आहे.
बांगलादेश संघात शाकिबची कमी
बांगलादेश संघात धडाकेबाज खेळाडू शाकिब अल हसनची कमी जाणवती आहे. यावर उत्तर देताना तमीम म्हणाला, प्रत्येक वेळी प्रत्येक खेळाडू संघात असेलच असं नाही. पण आपण संबंधित प्लेअरविना खेळण्याची तयारी ठेवली पाहिजे.
शाकिब सुट्टीवर
बांगलादेश संघाचा कणा असलेल्या शाकिबने न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली आहे. शाकिब काही दिवसांपूर्वीच बाबा बनला आहे. पितृत्वाची रजा त्याने घेतली आहे. पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल 2021 मध्ये शाकिब कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे.
हे ही वाचा :