Bangladesh vs West Indies 1st Test | बांग्लादेशच्या कर्णधाराची अफलातून कामगिरी, केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड

मोमीनुल हकने (Mominul Haque) वेस्ट इंडिज विरुद्ध 115 धावांची शतकी खेळी केली.

Bangladesh vs West Indies 1st Test | बांग्लादेशच्या कर्णधाराची अफलातून कामगिरी, केला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड
मोमीनुल हक
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 6:21 PM

ढाका : क्रिकेटमध्ये (Cricket) दररोज अनेक रेकॉर्ड होतात, आणि ते ब्रेकही होतात. पण वर्ल्ड रेकॉर्ड सहसा होत नाही. पण बांगलादेशचा कर्णधार मोमीनुल हकने (Mominul Haque) ही कामगिरी करुन दाखवली आहे. मोमिनुल हकने वेस्टइंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत ही कामगिरी केली आहे. यासह तो अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. (Bangladesh vs West Indies 1st Test captain Mominul Haque sets world record with 115 runs)

मोमिनुलचा विश्व विक्रम

मोमिनुलने या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शतक झळकावलं. त्याने 182 चेंडूत 10 चौकारांसह 115 धावा केल्या. मोमिनुलच्या कसोटी कारकिर्दीतील हे 10 वं शतक ठरलं. विशेष म्हणजे हे 10 शतक त्याने बांगलादेशमध्ये लगावले आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. मोमिनुलने या 10 पैकी 7 शतकं ही चॅटोग्रामच्या मैदानात लगावली आहेत. बांगलादेशचा कर्णधार म्हणून मोमीनुलचे हे दुसरे शतक आहे. याबाबत त्याने मोहम्मद अशरफुल आणि महमूदुल्ला यांची बरोबरी केली. त्याच्या नावावरही दोन कसोटी शतके आहेत.

मोमिनुल हकच्या अगोदर इंग्लंडच्या अॅलेन लॅम्बने मायदेशात नऊ कसोटी शतके ठोकली होती. पण त्याचे 10 वे शतक वेस्ट इंडीज विरुद्ध किंग्सटन येथे झाले.

विंडिजचा बांगलादेशवर 3 विकेट्सने विजय

दरम्यान या पहिल्या कसोटीत विंडिजने 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. बांगलादेशने विंडिजला विजयासाठी 395 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान विंडिजने 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. विंडिजकडून काइल मेयर्सने द्विशतक झळकावलं. त्याने एकूण 210 धावा केल्या. तर एनक्रुमाह बोनरने 86 धावांची खेळी केली.

दरम्यान या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ढाक्यातील शेरे ए बांगला स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. हा सामना 11 ते 15 फेब्रुवारीदरम्यान खेळवला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 1st Test, 3rd Day Highlights | तिसऱ्या दिवसखेर टीम इंडियाच्या 6 बाद 257 धावा, अजूनही 321 धावांनी पिछाडीवर

India vs England 1st Test | फिरकीपटू अश्विनची शानदार कामगिरी, ठरला तिसरा भारतीय गोलंदाज

India vs England 1st Test, Day 2 | बेन स्टोक्सची धमाकेदार अर्धशतकी खेळी, विक्रमाला गवसणी, ठरला तिसरा इंग्रज फलंदाज

(Bangladesh vs West Indies 1st Test captain Mominul Haque sets world record with 115 runs)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.