BAN vs SL Toss | बांगलादेशने टॉस जिंकला, श्रीलंका टीमची पहिली बॅटिंग
Bangladesh vs Sri Lanka Toss | कुसल मेंडीस याच्या नेतृत्वात श्रीलंका क्रिकेट टीमसाठी हा करो या मरो असा सामना आहे. त्यामुळे श्रीलंकाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.
नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 38 व्या सामन्यात आज 6 नोव्हेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. हा सामना अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला आहे. बांगलादेशने टॉस जिंकलाय. कॅप्टन शाकिब अल हसन याने फिल्डिंगचा निर्णय घेत श्रीलंकाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. बांगलादेश आणि श्रीलंका टीमने प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केलाय.
बांगलादेश टीम वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे बांगलादेशला हार-जीतने तसा काहीच फरक पडणार नाही. मात्र बांगलादेशचा शेवटी शेवटी जाता जाता काही शिल्लक सामने जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेसाठी वर्ल्ड कप सेमी फायनलमधील उरलंसुरलं आव्हान कायम ठेवण्यासाठी बांगलादेश विरुद्धचा सामना काहीही करुन जिंकावाच लागेल. त्यामुळे आता श्रीलंका कशाप्रकारे खेळते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
दोन्ही संघांमध्ये बदल
श्रीलंका टीमने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. कुसल परेरा आणि धनंजया डी सिल्वा या दोघांची एन्ट्री झाली आहे. तर करुणारत्ने आणि हेमंथा या दोघांना बाहेर ठेवण्यात आलं आहे. तर बांगलादेश एकमेव बदल केला आहे. तंजीद हसन याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तंजीदला मुस्तफिजुर याच्या जागी स्थान संधी देण्यात आली आहे.
नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने
ICC Men’s Cricket World Cup 2023 Bangladesh 🆚 Sri Lanka 🏏
Bangladesh won the toss and decided to field 🇧🇩
Photo Credit: ICC/Getty#BCB | #SLvBAN | #CWC23 pic.twitter.com/JGR1zyvpoB
— Bangladesh Cricket (@BCBtigers) November 6, 2023
वर्ल्ड कपमधील आकडे
दरम्यान बांगलादेश विरुद्ध श्रीलंका दोन्ही संघं चौथ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधीच्या 3 सामन्यात श्रीलंकाच वरचढ राहिली आहे. श्रीलंकाने 3 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला अजूनही खातं उघडता आलेलं नाही.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शकिब अल हसन (कॅप्टन), तन्झिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, तॉहिद हृदोय, मेहदी हसन मिराझ, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद आणि शोरीफुल इस्लाम.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.