BBL 2020 | 2 पॉवर प्ले, बोनस पॉइंट्स, T20 मधील तीन नव्या नियमांनी रंगत
बीग बॅश स्पर्धेच्या 10 व्या पर्वाला 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
कॅनबेरा : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमाचा शेवट झाला आहे. त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India Tour Australia) दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला आयपीएलनंतर काही दिवसांनंतर क्रिकेट चाहत्यांना बीग बॅश लीगचा आनंद लूटता येणार आहे. या बीग बॅश लीगसाठी (BBL 2020) 3 नियमांमध्ये बदल केले आहेत. ही स्पर्धा अधिक रोमांचकारक बनवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांची माहिती बीग बॅश लीगच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन देण्यात आली आहे. bbl 2020 3 new rules for big bash league 2020
Entertainment levels ?
“The Power Surge, X-Factor and Bash Boost prioritise high scoring, exciting cricket, introduce new strategic angles and ensure there’s always something to play for throughout the entire match," – Head of BBL, Alistair Dobson #BBL10 pic.twitter.com/Nacna2XHw9
— KFC Big Bash League (@BBL) November 15, 2020
असे आहेत नियम
या स्पर्धेत नव्या नियमांनुसार 2 पावर प्ले असणार आहेत. सर्वसाधारणपणे पॉवर प्ले सुरुवातीच्या 6 ओव्हरपर्यंत असतो. सामन्याच्या पहिल्या पावर प्लेमध्ये 2 ओव्हरने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्येच पावर प्ले असणार आहे. तर त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या संघाला 11 व्या ओव्हरनंतर कधीही पॉवरप्लेच्या 2 ओव्हरचा वापर करता येणार आहे. या निर्णयामुळे प्रत्येक संघाला फायदा होणार आहे.
एक्स फॅक्टर खेळाडू
सामन्याच्या काही तासांआधी प्लेइंग इलेव्हन म्हणजेच अंतिम 11 खेळाडू ठरवले जातात. या खेळाडूंनाच मैदानात विरोधी संघाविरोधात खेळता येतं. मात्र नव्या नियमानुसार 12 आणि 13 क्रमांकाच्या खेळाडूला खेळण्याची संधी मिळणार आहे. सामन्याच्या 10 ओव्हरनंतर प्लेइंग इलेव्हनमधील एका खेळाडूच्या बदलीत प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नसलेल्या खेळाडूला संघात स्थान देता येणार आहे. मात्र यासाठी काही अटी आहेत. ज्या खेळाडूला बदली करण्यात येणार आहे, त्या खेळाडूने त्या सामन्यात फलंदाजी केलेली नसावी. किंवा बदली करण्यात येणारा खेळाडू जर गोलंदाज असेल तर त्याने त्या सामन्यात 1 ओव्हरपेक्षा जास्त गोलंदाजी केलेली नसावी. अशा खेळाडूंचीच बदली करुन दुसऱ्या खेळाडूंना संघात समाविष्ट करता येऊ शकणार आहे.
अतिरिक्त बोनस पॉइंट
नव्या नियमांनुसार एका सामन्यासाठी 4 पॉइंट्स असणार आहेत. यापैकी 3 पॉइंट्स हे विजयी टीमला मिळणार आहेत. तर उर्वरित 1 पॉइंट हा बोनस स्वरुपात असणार आहे. 10 ओव्हरनंतर ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल, त्या संघाला हा बोनस पॉइंट मिळणार आहे.
एकूण 68 दिवस चालणार स्पर्धा
बीग बॅश लीगचं पर्व एकूण 68 दिवस चालणार आहे. या स्पर्धेला 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर शेवट 6 फेब्रुवारीला होणार आहे. या नव्या बदलांमुळे क्रिकेट रसिकांना नक्कीच आणखी रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत, याबद्दल अजिबात शंका नाही.
आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया क्रिकेटने बीग बॅश लीग स्पर्धेंच 2011 मध्ये पहिल्यांदा आयोजन केलं होतं. तेव्हापासून ही स्पर्धा खेळवण्यात येतेय. या स्पर्धेत आयपीएलप्रमाणे एकूण 8 संघांचा समावेश असतो. अॅडलेड स्ट्रायकर्स, ब्रिस्बेन हिट, होबार्ट हरिकेन्स, मेलबर्न रेनेगेड्स, मेलबर्न स्टार्स, पर्थ स्क्रॉचर्स, सिडनी सिक्सर्स, सिडनी थंडर असे 8 संघ या या स्पर्धेत खेळतात. पर्थ स्क्रॉचर्सने सर्वाधिक 3 वेळा या स्पर्धेतचं जेतेपद पटकावलं आहे. दरवर्षी डिसेंबर-फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धेंचं आयोजन करण्यात येतं.
संबंधित बातम्या :
वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी युवा क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रिकेट विश्वावर शोककळा
IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या आयोजनासाठी बीसीसीआयकडून यूएई बोर्डाला ‘इतके’ कोटी
bbl 2020 3 new rules for big bash league 2020