IndvsAus : मिशन फत्ते केल्यानंतर टीम इंडियाच्या ‘या’ गोलंदाजाचं रुबाबदार कमबॅक
बीसीसीआयने उर्वरित 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजाने कमबॅक केलं आहे.
मुंबई : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाचा दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पराभव केला आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील चार सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडिया आता 2-0 ने आघाडीवर आहे. दिल्लीमधील कसोटी सामन्यामध्ये भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. अशातच बीसीसीआयने उर्वरित 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजाने कमबॅक केलं आहे. वेगवान गोलंदाज फॉर्ममध्ये असल्याने कांगारूंसाठी धोक्याचं ठरू शकतं.
कोण आहे हा खेळाडू?
बीसीसीआयने याआधी फक्त पहिल्या 2 कसोटींसाठीच भारतीय संघाची घोषणा केली होती. निवड केलेल्या संघामध्ये बीसीसीआयने केएल राहुलला फ्लॉप कामगिरीनंतरही त्याच्यावर विश्वास दाखवत संधी दिली आहे. कमबॅक केलेला गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून जयदेव उनाडकट आहे. इतकंच नाहीतर त्याची वनडे संघातही निवड झाली आहे.
जयदेव उनाडकटची या मालिकेसाठी आधीच निवड झाली होती. मात्र त्याला दुसरी कसोटी सामन्याआधी बीसीसीआयने रीलीज केलं होतं. रणजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी जयदेव उनाडकटला रीलीज करण्यात आलं होतं. जयदेवनेही या संधीचं सोन करत सौराष्ट्र संघाला फायनलमध्ये विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
दरम्यान, रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये बंगाल संघाचा पराभव करत सौराष्ट्रने 2023 च्या रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. कर्णधार जयदेव उनाडकटच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या सौराष्ट्र संघाने गेल्या तीन वर्षात दोनवेळा रणजी स्पर्धा सौराष्ट्रने जिंकली आहे. एकट्या जयदेवने बंगालच्या दुसऱ्या डावातील 6 विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर जयदेवला ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
उर्वरित 2 कसोटींसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.