IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमाचा थरार आजपासून, 6 शहरांत आयोजन, 11 डबल हेडर मॅच आणि बरंच काही…!

9 एप्रिलपासून आयपीएलच्या 14 व्या मोसमाला आजपासून (IPL 2021 TimeTable) सुरुवात होणार आहे. सलामीची लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे.

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमाचा थरार आजपासून, 6 शहरांत आयोजन, 11 डबल हेडर मॅच आणि बरंच काही...!
9 एप्रिलपासून आयपीएलच्या 14 व्या मोसमाला (IPL 2021 TimeTable) सुरुवात होणार आहे. या मोसमाचं आयोजन भारतात करण्यात आलं आहे.
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 2:47 PM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमाचा थरार आजपासून अनुभवता येणार आहे.  14 व्या हंगामाची सुरुवात आजपासून म्हणजेच 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना आज गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Muambai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals challengers banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर ही लढत खेळली जाणार आहे. (Bcci Announces  Schedule For Ipl 2021)

पहिल्या सामन्यात रोहित आणि विराट आमनेसामने

या मोसमातील पहिला सामना हा गत विजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीत एकूण 56 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे पार पडणार आहेत.

एकूण 6 शहरात सामन्याचं आयोजन

चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरुमध्ये प्रत्येकी 10-10 सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दिल्ली आणि अहमदाबादमध्ये प्रत्येकी 8-8 सामने खेळवण्यात पार पडणार आहेत.

एकूण 11 डबल हेडर मॅच

या पर्वात एकूण 11 डबल हेडर मॅच खेळवण्यात येणार आहेत. डबल हेडर म्हणजेच एकाच दिवसात 2 सामने. साधारणपणे हे डबल हेडर सामने शनिवार आणि रविवारी खेळवण्यात येतात. डबल हेडरमधील पहिल्या सामन्याला दुपारी 3. 30 वाजता सुरुवात होणार आहे. तर दिवसातील दुसऱ्या सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

प्ले ऑफ आणि अंतिम सामना अहमदाबादमध्ये

14 व्या पर्वातील प्ले ऑफचे सामने (बाद फेरी) हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. तसेच अंतिम सामनाही याच मैदानात आयोजित करण्यात आला आहे. अंतिम सामना 30 मे ला पार पडणार आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 13 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईकडून यावेळेसही विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करणार का, याकडे मुंबईच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2021 Date And Schedule : आयपीएलला 9 एप्रिलपासून सुरुवात, 30 मे रोजी फायनल

(Bcci Announces  Schedule For Ipl 2021)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.