भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडवर सर्वात मोठी जबाबदारी

ज्युनियर संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडने भारतीय संघासाठी अनेक चांगले खेळाडू दिले आहेत. आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटचं मजबूत भविष्य करण्यासाठी राहुल द्रविडवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडवर सर्वात मोठी जबाबदारी
Follow us
| Updated on: Jul 08, 2019 | 10:31 PM

मुंबई : बीसीसीआयने द वॉल राहुल द्रविडवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. क्रिकेटर तयार करणारा कारखाना असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) अध्यक्षपदी राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्युनियर संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडने भारतीय संघासाठी अनेक चांगले खेळाडू दिले आहेत. आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटचं मजबूत भविष्य करण्यासाठी राहुल द्रविडवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

एनसीएला एका हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये रुपांतरित करण्याचं बीसीसीआयचं नियोजन आहे, ज्यामुळे युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. एनसीए प्रमुख म्हणून सर्व वयोगटातील प्रशिक्षण कार्यक्रम आता राहुल द्रविडकडूनच तयार केले जातील. याशिवाय महिला क्रिकेटची जबाबदारीही राहुल द्रविडकडेच असेल. फक्त खेळाडूच नव्हे, तर खेळाडूंच्या फिटनेससाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे फिजिओ आणि कंडनिशनिंग ट्रेनर्ससाठीही द्रविडकडूनच कार्यक्रम आखला जाईल.

अंडर-19 क्रिकेटचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडने अनेक युवा खेळाडू घडवले आहेत. 2018 मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये झालेला अंडर-19 विश्वचषकही जिंकला होता. यानंतर आता प्रशिक्षकांपासून ते खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमाची जबाबदारी राहुल द्रविडवर टाकण्यात आली आहे. एनसीएमध्ये रिक्त पदांसाठी राहुल द्रविड लवकरच भरती प्रक्रिया सुरु करणार आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राहुल द्रविड भारतीय अ संघ आणि अंडर-19 संघासोबत परदेश दौऱ्यावरही असेल. संपूर्ण दौऱ्यात तो सोबत नसला तरी संघासाठी तो उपलब्ध असेल. ही सर्वात मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे संघासोबत जास्त राहण्याऐवजी एनसीएवर लक्ष केंद्रीत करावं लागेल, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.