Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL मध्ये 8 ऐवजी 10 संघ, BCCI च्या वार्षिक बैठकीत निर्णय, दोन नवे संघ कोणते?

BCCI च्या निर्णयानुसार 2022 च्या आयपीएलमध्ये (IPL15) 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. BCCI approves 10-team IPL

IPL मध्ये 8 ऐवजी 10 संघ, BCCI च्या वार्षिक बैठकीत निर्णय, दोन नवे संघ कोणते?
आयपीएल ट्रॉफी
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 4:25 PM

अहमदाबाद: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) अहमदाबाद येथे वार्षिक सर्वसाधारण बैठक (AGM)होत आहे. या बैठकीत इंडियन प्रिमियर लीगमध्ये(IPL) 2022 पासून 10 संघ(Ten teams) खेळण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 सालच्या आयपीएलमध्ये (IPL15) 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएलमधील नव्या फ्रेंचायजींच्या सहभागाच्या मुद्यावर चर्चा झाली. आता कोणत्या 2 संघांना आयपीएलमध्ये संधी मिळणार ते पाहावे लागणार आहे. (BCCI approves 10-team IPL from 2022 decision take in annual general meeting today)

सध्याचे 8 संघ

चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज ईलेव्हन पंजाब, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स

2021 मध्ये 10 संघ खेळवणे घाईचे ठरेल

अनेक तज्ज्ञांचं मत आहे की, आयपीएलमध्ये 9 किंवा 10 संघांचा समावेश करणं चांगलंच असेल, परंतु हा बदल 2021 च्या आयपीएलमध्ये केला तर ती घाई ठरेल. त्याऐवजी 2022 च्या आयपीएलमध्ये हा बदल केला तर नियोजनाच्या दृष्टीकोनातून तो योग्य निर्णय ठरेल. आयपीएलची पुढील स्पर्धा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात नव्या संघाला संघबांधणी करायला पुरेसा वेळ मिळणार नाही.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकरणात बर्‍याच मार्गांवर चर्चा होणे आवश्यक आहे. एप्रिलमध्ये आयपीएल सुरु होण्यापूर्वी लिलावासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. अशात 2021 च्या स्पर्धेत नवे संघ समाविष्ट करणं अवघड आहे.’’

“नव्या संघांसाठी निविदा मागवाव्या लागतील तसेच नवी लिलाव प्रक्रिया तयार करावी लागेल. जानेवारी अखेरपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला लिलाव प्रक्रिया पार पडली आणि त्यात दोन संघांनी बाजी मारली तर त्यांना खेळाडूंच्या लिलावात सहभागी होता येईल, त्यासाठीची रणनीति आखायला वेळ मिळेल. त्यामुळे आयपीएलमध्ये नव्या संघांचा समावेश 2022 च्या मोसमातच होऊ शकतो.”

“आयपीएलमध्ये 10 संघांचा समावेश करण्यात आला तर स्पर्धेत 94 सामने खेळवावे लागतील. त्यासाठी किमान अडिच महिन्यांचा अवधी हवा आहे. केवळ आयपीएलसाठी अडिच महिन्यांचा कालावधी लागला तर आंतरराष्ट्रिय क्रिकेट कॅलेंडर गडबडेल.”

कोरोनामुळे लिलावाच्या कार्यक्रमात बदल?

दरवेळेस आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात खेळाडूंचा लिलाव करण्यात येतो. यामध्ये अनेक संघ खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजून आपल्या ताफ्यात त्यांना समाविष्ट करुन घेतात. मात्र आगामी आयपीएल स्पर्धेसाठीचा ऑक्शन कार्यक्रम महिन्याभराच्या विलंबाने होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनुसार मिळाली आहे.

आयपीएलमध्ये नवे संघ जोडले जाण्याची शक्यता असल्याने आयपीएलच्या इतर नियमांमध्ये बदल अपेक्षित असतील. यामध्ये साखळी फेरीतील संघाच्या सामन्यांची संख्या यांसारख्या बाबींमध्ये बदल होऊ शकतो. यासर्व बाबींमुळे बीसीसीआय लिलावाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे सविस्तररित्या घेण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे लिलावाचा कार्यक्रम पुढील जानेवारी महिन्यात पार पडेल, अशी चर्चा आहे.

संबंधित बातम्या:

IPL मध्ये 8 ऐवजी 10 संघ खेळणार, BCCI च्या वार्षिक बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

IPL मधील संघांची संख्या वाढवण्याच्या BCCI च्या योजनेला राहुल द्रविडचं समर्थन; सांगितलं ‘कारण’

IPL | 13 वर्षात मुंबईने पाचव्यांदा किताब जिंकला, ‘हे’ तीन संघ मात्र अजूनही विजेतेपदापासून दूर

(BCCI approves 10-team IPL from 2022 decision take in annual general meeting today)

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....