BCCI : बीसीसीआय महेंद्रसिंग धोनीला मोठी जबाबदारी देण्याची शक्यता ?
या कारणामुळे बीसीसीआय महेंद्रसिंग धोनीला मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत ?
मुंबई : टीम इंडियाच्या (IND) खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत (T20 WC) खराब कामगिरी केल्यामुळे निवड समितीसह टीम इंडियावरती जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ एक मोठा निर्णय घेण्याचा तयारी असल्याची माहिती मिळाली आहे. बीसीसीआय (BCCI) टीम इंडियाचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याला एक मोठं पद देण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय भारतीय क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी धोनीला बोलावण्याचा विचार करीत आहे.
भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला क्रिकेटचं संचालक पद मिळण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्यावर विचार करीत आहे. द टेलिग्रॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक राहूल द्रविडला तिन्ही फॉरमॅटमधील प्रशिक्षक पद संभाळणं अवघड जात आहे. त्यामुळे तिन्ही फॉरमॅटसाठी वेगळ्या प्रशिक्षकाचा विचार सुरु आहे. या महिन्यात ज्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक होईल त्यावेळी धोनीचा प्रस्ताव चर्चीला जाणार आहे.
महेंद्रसिंग धोनी यंदाच्या आयपीएल हंगामानंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर बीसीसीआय धोनीच्या अनुभव आणि टेक्निकचा फायदा करुन घेण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे धोनीला मोठं पद देण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ करीत आहे. महेंद्रसिंग धोनीने दोनवेळा टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला. विशेष म्हणजे टी20 ची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
या महिन्याच्या अखेरीस ज्यावेळी क्रिकेटच्या दिग्गजांची बैठक होईल, त्यावेळी धोनीच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.