दुबई : सौरव गांगुली उर्फ ‘दादा’, इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष. गांगुली गेल्या काही महिन्यांपासून व्यग्र आहे. दुबईमध्ये आयपीएलच्या नियोजनापासून ते आतापर्यंत गांगुली पूर्णपणे व्यग्र आहे. अध्यक्ष या नात्याने गांगुलीला अनेक देशांमध्ये प्रवास करावा लागतोय. त्यात कोरोनाची साथ. यामुळे गांगुलीने खबरदारीचा उपाय म्हणून एक दोन नाही तर तब्बल 22 वेळा स्वत:ची कोरोना चाचणी केली आहे. याबाबतची माहिती स्वत: गांगुलीने दिली आहे. BCCI president Sourav Ganguly a total of 22 Covid-19 tests in 135 days
गांगुली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेला उपस्थित होता. यादरम्यान त्याने ही माहिती दिली. “मी गेल्या साडे चार महिन्यात अर्थात 135 दिवसांमध्ये एकूण 22 वेळा कोरोना चाचणी केली. या 22 वेळेसही माझा कोरोना अहवाल नेगेटिव्ह आला. माझ्या आसपासचे काही जणं हे पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून मी ही चाचणी केली. मी माझ्या वयोवृद्ध आई वडिलांसोबत राहतो. तसेच मी दुबईलाही गेलो होतो. सुरुवातीला मी स्वत: साठी नाही तर समाजातील इतर कोणाला कोरोना होवू नये, यासाठी चिंतीत होतो. आपल्यामुळे इतर कोणाला बाधा पोहचू नये, ही काळजी मनात होती”, असं गांगुली म्हणाला. तसेच गांगुलीने टीम इंडियाच्या क्वारंटाईन कालावधीबाबतही माहिती दिली
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी मंगळवारी 24 नोव्हेंबरला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. भारताचे सर्व खेळाडू फीट आहेत, अशी माहिती गांगुलीने दिली.
“इंग्लडच्या भारत दौऱ्यात बदल करण्यात आले आहेत. पुढील म्हणजेच 2021 मध्ये इंग्लडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये 5 ऐवजी 4 टेस्ट मॅच खेळण्यात येणार आहेत. एक टेस्ट कमी करुन त्याजागी 2 टी सामने वाढवण्यात आले आहेत. कोरोनामुळे हा इंग्लंडचा दौरा रद्द करण्यात आला होता. दरम्यान आता बीसीसीआय पुढील वर्षाच्या आयपीएल स्पर्धेआधी हा इंग्लडचा भारत दौरा संपवण्याच्या मानसिकतेत आहे. इंग्लंडचा संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 4 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे”अशी माहिती गांगुलीने दिली.
संबंधित बातम्या :
BCCI president Sourav Ganguly a total of 22 Covid-19 tests in 135 days