Sourav Ganguly | सहा दिवसांच्या उपचारानंतर ‘दादा’ ठणठणीत, सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज

सौरव गांगुलीला 2 जानेवारीला कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Sourav Ganguly | सहा दिवसांच्या उपचारानंतर 'दादा' ठणठणीत, सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज
सौरव गांगुली
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 11:20 AM

कोलकाता : बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला (BCCI President Sourav Ganguly) वुडलॅंड्स रुग्णालयातून (Woodlands Hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे. गांगुलीला सहा दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. एनएआय वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. मी पूर्णपणे ठणठणीत आहे. मी डॉक्टरांचे आभार मानतो. तसेच माझ्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना केलीत, मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे, अशी पहिली प्रतिक्रिया सौरव गांगुलीने डिस्चार्जनंतर दिली. (BCCI President Sourav Ganguly discharged from Woodlands Hospital in Kolkata)

गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला वर्कआऊट करताना डोळ्यांसमोर अंधारी आली. यानंतर त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर गांगुलीला कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गांगुलीला बुधवारी 6 जानेवारीलाच डिस्चार्ज देण्यात येणार होता. “मला आणखी एक दिवस रुग्णालयात थांबायचं आहे”, अशी इच्छा गांगुलीने व्यक्त केला. यामुळे रुग्णालयातील मुक्काम एका दिवसाने वाढला.

गांगुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेतून गांगुलीला एकूण 3 ब्लॉकेज असल्याचं निदान झालं. या शस्रक्रियेतून एक मोठा ब्लॉकेज काढण्यात आला. “हा काढण्यात आलेला ब्लॉकेज मोठा होता. यामुळे गांगुलीच्या हृदयाला सुरळित रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत होता”, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

गांगुलीसाठी देशभरातून प्रार्थना

गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर गांगुलीच्या उत्तम प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना करण्यात आली.  अनेक क्रिकेटपटूंनी गांगुलीसाठी प्रार्थना केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलीच्या पत्नीशी फोनद्वारे संपर्क साधून चौकशी केली. तसेच मदतीचे आश्वासनही दिले होते.

गांगुलीला ट्रिपल वेसल डिजीजची बाधा

गांगुलीला Triple vessel disease ची बाधा आहे. या आजारामुळे हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. योग्य आणि सुरळीतपणे रक्तपुरवठा न झाल्याने गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

संबंधित बातम्या :

Sourav Ganguly | हृदयविकाराच्या सौम्य झटक्यानंतर सौरव गांगुलीवर अँजियोप्लास्टी होणार

Sourav Ganguly | “दादा बंगालचा वाघ, भाजपमध्ये आल्यास स्वागत”, गांगुलीसाठी भाजपची फिल्डिंग

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा सौरव गांगुलीच्या पत्नीला फोन, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

(BCCI President Sourav Ganguly discharged from Woodlands Hospital in Kolkata)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.