Sourav Ganguly: सौरव गांगुलीनं बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडलं?, नव्या इनिंगची घोषणा, भाजपात प्रवेश करणार?

बीबीसीआयचे धडाकेबाज अध्यक्ष सौरव गांगुली आपल्या पदाचा राजीनामा देणार का? अशी चर्चा आहे. सौरव गांगुली गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत होते, त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Sourav Ganguly: सौरव गांगुलीनं बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडलं?, नव्या इनिंगची घोषणा, भाजपात प्रवेश करणार?
BCCI President Sourav Ganguly Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 6:29 PM

मुंबई : आत्ताच क्रिकेट (Cricket)  विश्वातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. बीबीसीआयचे धडाकेबाज अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा (Bcci president sourav ganguly resigns) आहे. सौरव गांगुली गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत होते. सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. भारताचा पूर्व धाकड कर्णधार अशीही सौरव गांगुली यांची ओळख आहे. त्यांंच्या अनेक धडाकेबाज निर्णयांसाठी त्यांना ओळखलं जातं. अनेक प्रकरणे त्यांनी आक्रमकरित्या हाताळली आहे. सौरव गांगुली यांच्या काळातच भारतीय क्रिकेटचा कर्णधार बदलल्याचेही सर्वांनी पाहिलं. कर्णधार पदावरून विराट कोहलीला हटवून कर्णधार पद हे अलिकडेच रोहित शर्माला देण्यात आलं आहे. त्यावेळीही गांगुली यांची भूमिका चर्चेत राहिली होती. आता ते राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची शक्यता आहे.

सौरव गांगुली यांचं ट्विट

सौरव गांगुली यांचं पत्र जसच्या तसं

1992 ला माझा क्रिकेटचा प्रवास सुरु झाला आणि 2022 हे त्या प्रवासाचं तिसावं वर्ष आहे. तेव्हापासून क्रिकेटनं मला भरपूर काही दिलंय. त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही दिलेला सपोर्ट. मी त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार व्यक्त करु इच्छितो जो ह्या प्रवासाचा भाग झाला, पाठिंबा दिला आणि मदत केली. त्या बळावरच आज मी तिथं पोहोचलोय जिथं आहे. आज मी नवी काही योजना बनवतोय जी मला वाटतं की अनेक लोकांना फायदेशीर ठरेल. मला आशा आहे की, माझ्या आयुष्याच्या ह्या नव्या चॅप्टरमध्येही तुम्ही मला सपोर्ट कराल. -सौरव गांगुली

भाजपात प्रवेश करणार?

सौरव गांगुली यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार कोट्यातून राज्यसभा खासदार पदी निवड होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. कारण गेल्या अनेक दिवासांपासून सौरव गांगुली हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. आता त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नवी इनिंग…असा सूचक उल्लेख केल्याने आता या राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. त्यामुळे सौरव गांगुली येत्या काळात राजकारणात उतरणार का? आणि राजकारणात उतरल्यास कोणत्या पक्षाकडून उतरणार? हेही पाहणं तितकेच महत्वाचे ठरणार आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “ह्या नव्या चॅप्टरमध्येही तुम्ही मला सपोर्ट कराल” असा आवाहनही त्यांच्या फॅन्सला केले आहे. त्यामुळे ते राजकीय कारकिर्दीला सुरूवात करु शकतात अशी जास्त शक्यता वर्तवली जातेय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.