द. आफ्रिका वि. श्रीलंका सामन्यावर मधमाशांचा हल्ला
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंकामध्ये सुरु असलेल्या विश्वचषक सामन्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. सामना सुरु असताना अचानक मधमाशांनी हल्ला केल्यामुळे सर्व खेळाडू जमीनीवर झोपले होते.
लंडन : दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या विश्वचषकातील सामन्यावर मधमाशांनी हल्ला केला. सामना सुरु असताना अचानक मधमाशांनी हल्ला केल्यामुळे सर्व खेळाडू जमीनीवर झोपले होते. यामुळे काही काळासाठी सामना थांबवण्यात आला होता. हे स्टेडिअम चेस्टर ली स्ट्रीट येथील नदी शेजारी आहे.
या घटनेचे फोटो क्रिकेट वर्ल्ड कप यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विश्वषकातील इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडल्याचे त्यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना अचानाक 47 व्या षटका दरम्यान मधमाशांनी खेळाडूंवर हल्ला केला. यामुळे खेळाडूंची एकच तारांबळ उडाली.
Bees two nations have a history!#SLvSA | #CWC19 pic.twitter.com/rEY9T7yhUD
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 28, 2019
क्रिकेट वर्ल्डकपने शेअर केलेले फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत. या फोटोवर अनेकजण मजेशीर असे कमेन्ट देत आहेत. या घटनेत सर्व खेळाडू सुखरुप आहेत.
दुसऱ्यांदा मधमाशांचा हल्ला
यापूर्वीही दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या सामन्या दरम्यान मधमाशांनी हल्ला केला होता. 4 फेब्रुवारी 2017 ला जोहन्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरु होता. यावेळीही मधमाशांनी हल्ला केला होता. यामुळे हा सामना काही वेळासाठी थांबवण्यात आला होता. या घटनेवेळीही क्रिस मॉरिस गोलंदाजी करत होते. या सामन्यात मधमाशा 27 वे षटक सुरु असताना आल्या होत्या.